Published On : Wed, Mar 11th, 2020

ज्ञानविहार मल्टीपरपज सोसायटीतर्फे महिला दिन साजरा

Advertisement

नागपूर : ज्ञानविहार मल्टीपरपज सोसायटीतर्फे महिला दिनानिमित्त रामाईनगर बौद्ध विहार येथे महिलांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी अध्यक्षस्थानी चित्रा पाटील, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुजाता लोखंडे, ऍड. सोनिया गजभिये तर प्रमुख उपस्थितीत कपिलनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक पाटील, संतोष लोखंडे, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा मेश्राम आदी मंचावर उपस्थित होते.
यावेळी वक्त्यांनी ज्वलन्त मुद्यांवर मत मांडत एनआरसी, सीएए यावर महिलांना माहिती दिली. यासह महिलांनी सक्षम बनून स्वावलंबी बनावे असे मत ऍड. सोनिया गजभिये व्यक्त केले. तर लोखंडे यांनी पोक्सो कायद्यासह ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ याविषयी प्रत्येक महिलेने आपल्या मुलींना माहिती द्यावी असे सांगितले.

प्रस्तिविक दर्शन थूल यांनी केले. संचालन अर्चना राऊत यांनी तर आभार संस्थेच्या अध्यक्षा कल्याणी इंदोरकर यांनीं मानले. यशस्वीतेसाठी धर्मेंद्र इंदोरकर, प्रमोद नितनवरे, रिता गजभिये, ज्योती नितनवरे, दीपा सांगोळे, कुसुम वर्मा, ऍड. सागर लोखंडे, शेखर गजभिये, संतोष वर्मा, पंकज लोखंडे, संतोष खडसे आदींनी परिश्रम घेतले.