Published On : Wed, Mar 11th, 2020

रामटेक शहरात होलिका दहन सन उत्साहात साजरा…..

Advertisement

रामटेक: भारतीय सणामध्ये होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणातून वाईट गोष्टींना तिलांजली तर चांगुलपणा कायम ठेवत गुण्यागोविंदाने वागण्याचा संदेश देत असते. होळी सणाचा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमी ही लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेच हा सण खूप उत्साहात साजरा करतात. मार्च महिना सुरू झाला की ,सर्वांना या सणाची उत्सुकता असते.

होलिका दहन या दिवसाला पौराणिक आधार असला तरी या सणाचा मूळ अर्थ आज समजून घेण्याची संख्या बोटावर मोजण्याइतपत राहिलेली आहे. “होळी रे होळी पुरणाची पोळी” म्हणत होलिका दहन उत्साहात साजरा करतात. गावा सह शहरात सुद्धा होळी पेटव तात.

बाजारपेठेत बच्चेकंपणी साठी रंगबिरंगी मुखवटे, पुंग्या, टोप्या, केसांच्या विग, पिचकाऱ्या, आता विक्रीस आल्या. रामटेक येथे रामाळेश्र्वर वार्ड , आंबेडकर वार्ड ,आणि पिपरिया गावात सुद्धा होलिका दहन सन लोकांनी खूप उत्साहात साजरा केला. ईश्वर हाण्डे, शालिक ढोके, महेश बरगट ,अनिल चकोले, विजय मर्जिवे, प्रभाकर तांदुलकर, मोरू मर्जिवे , राजु आम्बेपवार, श्याम गासमवार आदिनी एक मेकांना शुभेच्छा देत होलिका दहन ला सुरुवात झाली..

पिपरिया गावातील दिलीप बोपटे, दुर्गराम गोचेरिया, राज चिंचोलकर, मोरेश्वर कोहळे, मीना चिंचोलकर, राज चिंचोलकर, प्रियांश कुंभरे, शीतल चिंचोलकर होलीका दहन हा सन मोठ्या उत्साहात साजरा केलास्थानिक गांधी वार्ड मध्ये पांपरीक पद्धतीने, वैदिक मंत्रोच्चारात राममंदिराचे मुख्य पुजारी प.पु .मुकुंदराव पंडे यांच्या पौरोहित्यात अभयराव ठाणेकर यांनी होलीका दहन करण्यात आले. यावेळी महेश सावंत, प्रशांत फुरसुले, पप्पू ढोमणे, ,रजत गजभिये,ठाकुर, शेळके, जेष्ठ नागरिक नरेंद्र ठक्कर, सौ शिल्पा ढोमणे, आणि परिसरातील सर्व महिला पुरुष, बाल-गोपाल मोठ्या संख्येत उपस्थित होते.