Published On : Wed, Sep 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

पारडीमध्ये महिलेवर दबाव टाकून ३ लाखांची खंडणीची मागणी; अफेअरची माहिती पतीला सांगण्याची धमकी

पोलिसांकडून दोघांना अटक
Advertisement

अफेयर बताकर ₹3 लाख की फिरौती मांगने का आरोप, दो गिरफ्तार

नागपूर : पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेला अफेअरची माहिती पतीला सांगण्याची धमकी देत तिच्याकडून ३ लाख रुपयांची कथित खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे तर आरोपींनी महिलेच्या घरात घुसून चाकू आणि लाकडी दांड्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पारडी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय महिला पूर्वी आरोपी शेखर वर्मा याच्या कॅटरिंगच्या कामावर जात होती. मात्र, त्याचे वर्तन योग्य नसल्याने तिने काम सोडले. त्यानंतर शेखर वर्मा हा महिलेला धमकावत असल्याचा आरोप आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी तिच्यावर अफेअर असल्याचा आरोप करून त्याबाबत तिच्या पतीला सांगण्याची धमकी देत होता. ही बाब पतीला न सांगण्यासाठी त्याने ३ लाख रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

२९ सप्टेंबर रोजी महिला घरात एकटी असताना शेखर वर्मा हा लक्की रहाटे याच्यासोबत तिच्या घरी पोहोचला. दोघांच्या हातात चाकू आणि लाकडी दांडा असल्याचा आरोप आहे. शेखरने चाकू दाखवत महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली, तर दुसऱ्या आरोपीने दांड्याने मारण्याची धमकी दिल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले.

महिलेने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. त्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी पारडी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध खंडणीची मागणी, जीवे मारण्याची धमकी आणि हत्यार कायद्यासह गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.