Published On : Mon, Jun 12th, 2023
By Nagpur Today Nagpur News

मेडिकलच्या दारावरच ऑटोरिक्षात महिलेची प्रसूती; डॉक्टर व स्टाफ आले धावून, माता-बाळ सुरक्षित !

Advertisement

नागपूर : मेडिकलच्या दारातच डॉक्टर आणि परिचारिकेने प्रसंगावधान राखून महिलेची प्रसूती केल्याची माहिती समोर येत आहे. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी ऑटोरिक्षात महिलेला प्रसूती वेदना सुरू झाली. डॉक्टर आणि परिचारिकेने प्रसंगावधान राखून ऑटोतच महिलेची प्रसूती केली. तातडीने उपचार मिळाल्याने माता व बाळ दोघेही सुरक्षित आहे.

मेडिकलच्या आकस्मिक विभागाच्यादाराजवळ ऑटोमध्ये प्रसूती होत असल्याची माहिती सुरक्षा रक्षकाने डॉक्टरला दिली. यानंतर डॉक्टरसह त्यांची संपूर्ण टीम वेळ वाया न घालवता ऑटोकडे पोहोचले सर्वांनी सामूहिक प्रयत्नाने काळजीपूर्वक ऑटोतच महिलेची प्रसूती केली.

यात माता -बाळ सुरक्षित आहेत. तसेच डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.