Published On : Mon, Jun 12th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात नराधम मामाकडून चार वर्षीय भाचीवर अत्याचाराचा प्रयत्न !

Advertisement

नागपूर : एमआयडीसी पोलिस स्टेशनअंतर्गत शाली नगर परिसरात मणुकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नराधम मामाकडून चार वर्षीय भाचीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. अभिजित शेषराव मानेकर (वय २५) रा. एकात्मता नगर, हिंगणा रोड नागपूर असे आरोपीचे नाव आहे. तर पीडित बालिका ही एकात्मता नगराला लागून असलेल्या दुसऱ्या नगरात आईसोबत राहते.तिला वडील नाही.आरोपी हा तिचा दूरचा मामा लागतो.

माहितीनुसार, ही घटना शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. त्यानंतर रविवारी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. १० जून रोजी पीडितेची आई मजुरीचा गेली असताना दुपारी चार वाजताच्या सुमारास रोपी बालिकेला घेऊन घराशेजारी असलेल्या नाल्याजवळ घेऊन गेला. तिथे पीडितेसोबत अश्लील चाळे करत असताना काही तरुणांच्या निदर्शनास आले. यादरम्यान ते तरुण मुलीच्या मदतीसाठी धावले असता आरोपीने त्याठिकाणाहून पळ काढला. पण रविवारी ( ता.११)आरोपी पुन्हा सकाळी मुलीच्या घराकडे येताना दिसला.

परिसरातील तरुणांनी त्याला पकडले. त्या तरुणांनी पोलिस व मुलीच्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास ठाणेदार भीमा नरके यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शारदा भोपाळे करीत आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.