Published On : Wed, Sep 5th, 2018

वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अग्निशमन विभागाची ‘मॉक ड्रील’

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणिबाणी सेवा विभाग व आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे शनिवारी (ता. १) शंकरनगर येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये ‘मॉक ड्रील’ व ‘ईव्हेकेशन ड्रील’ घेण्यात आली.

Advertisement

हॉस्पिटमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास रुग्णांना इतर हॉस्पिटलमध्ये कसे स्थानांतरित करायचे, याची माहिती हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवाद्वारे देणे, हा या ‘मॉक ड्रील’चा उद्देश होता. ‘मॉक ड्रील’ दरम्यान वोक्हार्ट हॉस्पिटलच्या ७० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या टीम तयार करून ‘मॉक ड्रील’ घेण्यात आली.

Advertisement

याप्रसंगी हॉस्पिटलचे १०० ते १२५ डॉक्टर, मेन्टेनन्स अधिकारी, परिचारिका यांच्यासह कर्मचारी व रुग्णांचे सुमारे १५० नातेवाईक उपस्थित होते. ‘मॉक ड्रील’ प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कार्यकारी सहायक स्थानाधिकारी केशव आर. कोठे, कार्यकारी सहायक स्थानाधिकारी सुनील एस. राऊत, वाहन चालक तानेश पंधरे, सीताराम डहाळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement