Published On : Fri, Oct 6th, 2017

डेंगू समस्या सोबतच आता वाड़ी परिसरातील जनता विद्युत् भारनियामाने त्रस्त!

वाड़ी(अंबाझरी): गत एक महिन्यापासून वाडीतील जनता डेंगू आजाराने त्रस्त व भयभयित झाले आहेत,त्यातही या आजाराने गत महिन्यात 4 रुग्ण ही मृत्युमुखी पडल्याने नप सह, जिल्हा आरोग्य विभाग ,नेते, आमदार ही खळबळुन जागे होऊन कामला लागले असतानाच वाड़ी व ग्रामीण परिसरात विद्युत विभागाने सुरु केलेल्या भारनीयमनाने जनता अधिक नाराज झाल्याचे दिसून येत आहे.

गत 7 दिवसापासून वाड़ी-दत्तवाड़ी परिसरातील विदुयत पुरवठा अनेकदा बंद, सुरु होत असल्याची बाब आढळून आली, डेंगू इतर दैनंदिन अडचणी सोडविताना नागरिक , दुकानदार मग्न असताना खंडित विद्दुत पुरवठा, अनेकदा दुरुस्ती,देखरेख ई चे कारणे सांगून विद्युत् विभाग आपली बाजु मांडुन ग्राहकांना शांत करीत होते.मात्र दोन दिवसापासून निश्चित वेळेत विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक,रुग्ण,रुग्णालये, स्थानिक दुकानदार, संगन्नक संचालक चिंतेत पडले .या बाबत वाड़ी च्या स्थानिक विद्युत कार्यायलयाने कोणतीही रितसर सूचना ग्राहका साठी कोणत्याही माद्धयमातुन जारी केली नाही.

व गत दोन दिवसापासून वाड़ी परिसरात ही विद्युत भारनियमन सुरु करण्यात आल्याचे समजते.नुकताच हिवाळा सुरु झाला आहे, हिवाळ्यात वीजे चा वापर कमीच असतो तरी लोडशेडिंग सुरु झाल्याने ग्राहकात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.आताच जर ही परिस्थिति आहे तर मग उन्हाळ्यात काय भयंकर चित्र राहील या विचाराने नागरिक आतापासून चिंतेत पडले आहे.सध्या वाड़ी त मोठ्या प्रमाणात डेंगू चे रुग्ण, रुग्णालयात उपचारासाठी दाखल, तर रक्त तपासनीसाठी अनेक पैथोलॉजीत रुग्नाची गर्दी आहे,अहवाल प्राप्त झाल्याशिवाय रुग्नावर डॉक्टरांना उपचार सुरु करने शक्य होत नाही, मात्र या भारनियमामुळे या कार्यात अडचणी निर्माण झाल्याचे काही नागरिकांनी सांगीतले सामान्य परिसरातील चर्चेनुसार वाड़ी परिसरसाठी सोमवार ,मंगलवार, बुधवार गुरुवार ला सकाळी 6.30 ते 9.15,व दुपारी 3.15 ते 6.00 तर शुक्रवार ते रविवार सकाळी 8 ते 10.45 व दुपारी 3.45 ते 6.30 पर्यन्त भारनियमन वेळापत्रक असल्याचे समजते.

वाड़ी नप सध्या डेंगू आजार रोकन्यासाठी युद्ध स्तरावर कार्याला लागली खरी परन्तु ज्या फॉगिंग मशीन धुंवा सोडण्यासाठी घरोघरी वापरतात त्या मशीनी ला आधी चार्ज करावे लागते मात्र दिवसातुन 6 तास भारनिअमन सुरु झाल्याने शुक्रवारी या मशीनी चार्जिंग होउ न शकल्याने कर्मचारी फॉगिंग करु शकले नाही व नप मधे विज येण्याची वाट पाहत असल्याचे दिसून आले.या संदर्भात वाड़ी विद्युत वितरण विभागाचे सहायक अभियंता मेश्राम यांचेशि चर्चा केली असता सध्या पूर्ण महाराष्ट्रतच भारनियम सुरु करण्यात आले असून अनेक तांत्रिक अडचणी ने विज निर्मिति वर परिणाम पडल्याने वरिष्ट पातळीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, व हे केंव्हा पर्यन्त चालेल हे निश्चित सांगता येत नसल्याचेही मत त्यांनी वाड़ीतील पत्रकारांशी चर्चेत व्यक्त केले.

एकुनच ग्रामीन भागातील नागरिकाना आता इतर समस्या सोबत या भार नियम त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे.एके काळला भारनियमा विरोधात आंदोलन करणारे आता सत्तेत असल्याने आता ही जबाबदारी विरोधी पक्षावर आली आहे.आधीच जनता अड़चनीत असल्याने महाराष्ट्र शासन किती लवकर दिलासा देते या कड़े लक्ष् लागून आहे.