Published On : Tue, May 4th, 2021

पोलिसांच्या आशीर्वादाने कामठीत गांजा विक्री जोमात,

Advertisement

कामठी– नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहराची 1990 -92 मध्ये झालेल्या जातीय दंगलामुळे महाराष्टाच्या गॅझेट मध्ये राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे अतिसंवेदनशील शहर म्हणून नोंद कारण्यात आली आहे तेव्हा कामठी शहरात गुन्हेगारीवर अंकुश लादून कायद्याचे राज्य निर्माण व्हावे या मुख्य उद्देशातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडंणविस यांच्या शुभ हस्ते कामठी पोलीस स्टेशन नागपूर परिमंडळच्या पाचव्या झोन मध्ये निर्माण करीत शहर पोलीस आयुक्तालयात समावेश करीत मोठया गाजवाजाने 2014मध्ये शुभारंभ करण्यात आला असला तरी गुन्हेगारीचा ग्राफ पाहिजे तेवढा कमी झालेला दिसत नाही.दबंग म्हणून गाजलेले सी पी अमितेशकुमार व डीसीपी गजानन राजमाने यांच्या नावाने गुंडप्रवृत्तीच्या नागरिकांत चांगलीच दहशत माजली असून अवैध व्यवसायिकांनी इतरत्र आपले बस्तान मांडले आहे

तर सी पी अमितेशकुमार व डीसीपी राजमाने यांच्या कारवाहिने सुज्ञ नागरिकांत मोठे कौतुक करण्यात येत आहे मात्र काही वसुली बहाद्दूर पोलीस कर्मचारी आपल्या भ्रष्ट प्रवृत्तीतून अजूनही बाहेर पडले नाहोत ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.कामठी शहरात आजही अवैध धंदे चोरीचुप्या पद्धतीने बेभान सुरु असून अमली पदार्थाची बिनभोबाटपणे तस्करी सुरु आहे तर मागील वर्षी नागपूरच्या गुन्हे शाखा पोलिसांच्या अटकेत करण्यात आलेल्या कोकेंनतस्करकडून कामठी हे कोकेन व गर्द चे मोठे तस्कर असल्याचे कळले होते तसेच पोलिसांच्या आशीर्वादाने कामठी शहरात गांजा व अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून बिनधास्त पणे गांजा विक्री सुरू आहे तर कामठी बस स्थानक चौक, इमलीबाग, गोल बाजार चौक, मच्चीपुल चौक, कादर झेंडा, इस्माईलपुरा यासारखे कीत्येक परिसर गांजा व अंमली पदार्थाची तस्करी केंद्र बनले असून पोलिसांना मिळत असलेल्या चिरी मिरी मुळे या गांजा व्यवसायिकांना पोलिसांचा अभयपणा झाला आहे

सद्रक्षणाय खालनिग्रहनाय हे ब्रीद बाळगून जनसामान्यण्यासाठी सदैव तत्पर असणारे पोलिसावर शहरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची मुख्य जवाबदारी असते.मात्र काही भ्रष्ट पोलिसांमुळे या कर्तव्यदक्ष भूमिकेला गालबोट लागत असून शहरात काही प्रमाणात अवैध व्यावसायिकांचे जाळे पसरले आहे या शहरातील मुख्य औचित्यचा मुद्दा असलेला कामठीचा कत्तलखाना बंद करण्यात यशप्राप्त झाले असले तरीही गुप्तचरपद्धतीने व्यसवसाय सुरु आहेच ज्याची परिणीती पोलिसांकडून होत असलेली कारवाही देते.कामठी शहरात गांजा ची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून जागोजागी गांजा विक्री सुरू असून भरचौकात व बसस्थानक वा इतर ठिकाणी गांजा मद्यपी आढळून येतात पोलिसांच्या अशीर्वादामुळेच शहरात गांजा,चरस तसेच अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून यांना पोलिसांचा अभयपणा तयार झाला आहे तसेच कामठी शहरात कोकेंनतस्करासह गांजा व चरसविक्रीचे मोठे केंद्र असून याकडे पोलिसांनी अतिरिक्त कमाईकडे दुर्लक्ष पुरवून या अवैध धंद्यावर अंकुश लावावे अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे

संदीप कांबळे कामठी