Published On : Mon, Aug 26th, 2019

रस्त्यावरील अवैध पार्किंग व मोकाट जनावरे कुणाच्या आशिर्वादाने

कन्हान : – राष्ट्रीय महामार्गा वरील कन्हान, कांद्री शहरात वाहतुकीची चांगलीच वर्दळ असुन चारपदरी सिमेंट रस्ता निर्माण मंदगतीने व रस्ता दुभाजक पुर्ण न झाल्याने रस्त्या मधात व रस्त्यावर अवैध पार्किंग आणि मोकाट जनावरांचा धुमाकूळ असल्याने पायदळ, दुचाकी, चारचाकी वाहनाचे अपघात वाढुन निर्दोष लोकांना गंभीर दुष परिणाम भोगावे लागत आहे.

नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग चार पदरी सिमेंट रस्ता निर्माणकाम केसी सी कंपनी व्दारे ऑटोमोटिव्ह चौक नागपुर ते टेकाडी पर्यंत करण्यात येत असुन कन्हान, कांद्री शहरात अति मंद गतीने काम सुरू आहे. कन्हान शहराती ल रस्ता दुभाजक बनविण्यात न आल्या ने रस्ता मधोमध आणि रस्त्यावर वाहने दिवस रात्र अवैधरीत्या उभी राहत असल्याने रस्ता अरूंध तसेच मोकाट जनावरांचा धुमाकूळाने वाहन चालकाना पलीकडुन अलीकडे एकाएक सामोर आलेले वाहन किंवा जनावरामुळे धडक होऊन अपघाताला बळी पडावे लागते. कन्हान पोलीस स्टेशन पासुन ते टेकाडी बस स्टाप पर्यंत अवैध पार्किंग व मोकाट जनावराने दररोज कितीतरी अपघात होऊन निर्दोष लोकांना गंभीर दुषपरिणा म भोगावे लागत असते.

प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान ते आंबेडकर चौक, तारसा चौक, धर्मराज विद्यालया पर्यंत अपघाताचे प्रमाणात जास्त असल्याने कन्हान पोलीसांनी अवैध पार्किंगवर कार्यवाही करून शहरातील महामार्ग सुरक्षित करावा तसेच नगरपरिषद कन्हान-पिपरी आणि ग्राम पंचायत कांद्रीच्या प्रशासनाने व अधिका-यांनी शहरातील चारपदरी रस्त्यावरील मोकाट जनावरांवर योग्य कार्यवाही करून होणा-या अपघाताचे प्रमाण कमी करण्यात मदत करावी. अशी मागणी सर्वसामान्यातुन जोर धरू लागली आहे.

ऐन पावसाच्या दिवसात सुध्दा कन्हान, कांद्री येथील पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन रस्ता सुरक्षेते विषयी दुर्लक्ष करित असल्याने शहरातील राष्ट्रीय महामार्ग चापदरी सिमेंट रस्त्यावर अवैध पार्किंग व मोकाट जनावरांचा धुमाकूळ कोणाच्या आशिर्वाद ? असा प्रश्न शहर वाशी व प्रवाशांना पडला आहे.