Published On : Thu, Apr 15th, 2021

एम्सच्या़ डॉक्टरांसोबत ना. गडकरींनी घेतली बैठक

Advertisement

ऑक्सीजनसह व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करण्याचे निर्देश

नागपूर: कोरोनाचा शहरात वाढता प्रकोप लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एम्सच्या डॉक्टरांसोबत एक आढावा घेऊन परिस्थितीची माहिती करून घेतली. एम्सतर्फे कोविड रुग्णांना देण्यात येणार्‍या सुविधांबाबतही माहिती घेतली.

Gold Rate
04Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,500 /-
Gold 22 KT ₹ 1,12,100 /-
Silver/Kg ₹ 1,48,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या बैठकीला एम्सच्या संचालक डॉ. विभा गुप्ता, डॉ. श्रीगिरीवार उपस्थित होते. कोविडची शहरातील स्थिती पाहता निर्माण होणार्‍या समस्या व अडचणींवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ना. गडकरी यांनी डॉक्टरांना या बैठकीत सूचना केल्या.

एम्समध्ये बेडची संख्या वाढविणे, व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करणे, ऑक्सीजन पुरवठा वाढविणे आणि एचआरसीटी व्यवस्था युध्दपातळीवर कार्यान्वित करण्याचे निर्देशही याप्रसंगी ना. गडकरी यांनी एम्सच्या डॉक्टरांना दिले.

Advertisement
Advertisement