Published On : Tue, Apr 11th, 2023
By Nagpur Today Nagpur News

WINS २०२३ पुरस्कारासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा

- आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांचे आवाहन
Advertisement

नागपूर. : स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनात महिलांच्या प्रभावावर प्रकाश टाकण्यासाठी, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने वुमन आयकॉन लीडिंग स्वच्छता’ (WINS- विन्स) पुरस्कार 2023 ची घोषणा केली आहे. शनिवार १५ एप्रिल ही पुरस्कारासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असून, WINS २०२३ पुरस्कारासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा तसेच अधिकाधिक संख्येत अर्ज करावे असे आवाहन नागपूर महानारपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी केले.

मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. पुढे म्हणाले की, स्वच्छ भारत अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत “स्वच्छोत्सव 2023” चे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अशात महिलांच्या नेतृत्वाखालील संस्था आणि वैयक्तिक महिलांनी शहरी स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनातील प्रेरणादायी आणि अनुकरणीय उपक्रमांना ओळखणे आणि प्रसारित करणे हे “WINS पुरस्कार 2023” चे उद्दिष्ट आहे. याकरिता मनपाच्या हद्दीतील पात्र व्यक्ती / संस्थेकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यात स्वयं-सहायता गट (SHGs), सूक्ष्म उपक्रम, सामाजिक संस्था (NGO), स्टार्टअप्स आणि या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या वैयक्तिक महिला उद्योजक या पुरस्कारासाठी अर्ज करु शकतात तसेच सामुदायिक / सार्वजनिक शौचालयांचे व्यवस्थापन.(Management of Community / Public Toilets) सेप्टिक टाकी स्वच्छता सेवा. (Septic tank cleaning services) ट्रीटमेंट सुविधा – वापरलेले पाणी/सेप्टेज.(Treatment Facilities – Used Water/Septage) मनपाचे कचरा संकलन, वाहतूक (Municipal Waste Collection, Transportation) MRF ऑपरेशन ( MRF Operation) एफ) वेस्ट टू वेल्थ उत्पादने (Waste to Wealth products). ट्रीटमेंट सुविधा – घनकचरा व्यवस्थापन( Treatment Facilities – Solid Waste Management) माहिती शिक्षण संप्रेषण,प्रशिक्षण, क्षमता वाढवणे. (Information Education Communication,Training, Capacity Building). तंत्रज्ञान आणि आविष्कार (Technology and Innovation) व इतर Other (to be specified) या क्षेत्रात कार्य करणारी महिला व्यक्ती व संस्था अर्ज करू शकतात.

तरी सर्व इच्छुक नागरिक / संस्थांनी गटनिहाय किंवा व्यक्तिशः अर्ज नागपूर महानगरपालिका कार्यालयात दि १५ एप्रिल २०२३ पर्यंत सादर करावे, आपण E-mail : nmcsbmcitizenengagement@gmail.com यावर देखील अर्ज सादर करू शकतो. अर्जाचा प्रारूप www.nmcnagpur.gov.in संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. याशिवाय या उपक्रमाबाबत सविस्तर माहीती मनपा कार्यालय येथे पाहण्यास उपलब्ध आहे. तरी अधिकाधिक संख्येत महिलांनी विन्स पुरस्कारासाठी अर्ज करावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement