मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह यांच्यात काल दिल्लीत भेट झाली. यापार्श्वभूमीवर ते भाजपासोबत हातमिळवणी करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. मात्र अद्यापही मनसेकडून आणि भाजपकडून युतीची कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे यांची अमित शाह यांची भेट झाली आहे. मला असे वाटतं आत्ता या विषयावर काहीही प्री-मॅच्युअर बोलण्यापेक्षा एक-दोन दिवस वाट पाहा.
येत्या काळात लवकरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर काहीही स्पष्ट बोलणे टाळले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढली.
त्यांनी कोणत्याही पक्षाशी युती केली नाही. महापालिकेपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतते कधीच कोणत्या आघाडीत अथवा युतीत सहभागी झाले नाहीत. हे पाहता ते यंदा भाजपाची साथ देत महायुतीत सहभागी होणार का, हे पाहावे लागेल.