Published On : Thu, Jul 18th, 2019

आता तरी देवा मला पावशील का

देवा आज तरी पाउस येऊ दे रे ” हात जोडून देवाला प्रार्थना

रामटेक : रामटेक तालुक्यासह सम्पूर्ण जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत आणी त्या अंकुरल्या आहेत .परंतु त्यांच्या वाढीसाठी पावसाची गरज आहे परंतु 15 दिवसापासून पावसाने दांडी मारल्याने सर्व पेरण्या धोक्यात आलेल्या आहेत .त्यामुळे शेतकऱ्या च्या तोंडी एकच वाक्य ऐकण्यास मिळत आहे “देवा आज तरी पाउस येऊ दे रे ” अशी हात जोडून प्रार्थना करीत आहे .. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍याची दयनीय अवस्था झाली असून, यंदा लावलेली बियाने उन्हामुळे करपण्याची भीती निर्माण झाली. दुबार पेरणी करावी लागेल की, काय, या विवंचनेत सध्या बळीराजा दिसत आहे.

दुसरीकडे शेत मजुरांना काम नसल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. आलेले संकट पहाता ‘ नको देवराया, अंत असा पाहू ‘ म्हणत बळीराजाने आता थेट देवालाच साकडे घालायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. धनराज मेहरकुळे हया शेतकरी दाम्पत्यानी शेतकऱ्याच्या दयनीय अवस्थेला जिम्मेदार कोण , शेतकऱ्यांचा कुणीच वाली नसल्याची खंत व्यक्त केली .आता तरी देवा मला पावशील का !

देवा आज तरी पाउस येऊ दे रे ” हात जोडून देवाला प्रार्थना करीत शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनी वरून राजा कडे साकडे घातले .
पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट आले असल्याचे धनराज मेहरकुळे यांच्या पत्नीने सांगितले .

जून महिन्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस पडल्याने शेतकरी आनंदी दिसत होता. मात्र, आता दडी मारल्याने बळीराजा पुरता हैराण झाल्याचे चित्र आहे. इतर ठिकाणाप्रमाणेच कोरपना तालुक्यातही पावसाचा अंदाज पाहून शेतकर्‍यांनी नांगरणी व खरणीसह इतर शेतींची कामे पूर्ण करून पिकांची लागवड केली. आठवडा संपत असले तरी पावसाचा थांगपत्ता लागत नसल्याने शेतकर्‍यांना ‘येरे येरे पावसा’ म्हणण्याची वेळ आली आहे. दररोज उष्णतेचा तडाखा सुरूच असून, शेतकर्‍यांची यंदा निसर्गाच्या पावसा विषयी शंका कायम आहे. दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी त्यांना दमदार पावसाची गरज असून, पाऊस येणार की नाही? अशी चिंताही त्यांना भेडसावत आहे.

उन्हाळ्या सारखे दाहक उन्ह तापत असून, सूर्य आग ओकत आहे. जनजीवन कमालीचे अस्तव्यस्त झाले. तर लोकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. जर दोन चार दिवस वरूण राजाची कृपा झाली नाही. तर शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावणार हे मात्र नक्की!
निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा पूरता हवालदिल झालेला आहे. यंदाही नापिकीचा सामना करावा लागेल की काय? अशी धासती मनात भरली असून, पावसाच्या प्रतीक्षेत सतत आभाळाकडे डोळे लावून बळीराजा बसला आहे.