Published On : Mon, May 17th, 2021

वाईल्ड चॅलेंजर चे 6.फूट 3 इंच लांब विषारी नाग सापाचे रेस्क्यू ऑपरेशन

Advertisement

वादडी पावसामुळे आई पासन दूर झालेल्या नवजात मृग (हरिन) चा पिलाचे जीव धोक्या बाहेर . *

रामटेक – मौजा काचुरवाही येथील लक्षमण चरडे यांनी वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन चे सदस्य अक्षय घोडाकाडे याना कॉल केला व माहिती दिली की एक हरणीचा पिलू आपल्या आई पासन आमचा शेतात भटकला आहे व त्या साठी काही तरी मदत करावी अक्षय घोडाकाडे नि त्वरित वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन रामटेक सर्प मित्र व प्राणी मित्र चे अध्यक्ष राहुल कोठेकर याना माहिती दिली त्यांनी त्वरित संस्थेचे सचिव अजय मेहरकुळे व अक्षय घोडाकाडे ला सोबत घेत संस्थेचे ॲम्बुलन्स मी कचुरवाही कडे कूच केली घटनास्थडवर पोहोचून आजू बाजूचा शेतात असलेले वनाटकर,मधुर बावनकुळे,विशाल बावनकुळे, आकाश डोकरीमारे,अनिकेत साकोरे, सौरभ बावनकुळे यांना सोबत घेत आधी आजू बाजूचा शिवारात हरणीचा शोध घेतला तिथे हरनीचा शोध लागला नाही व जंगली कुत्र्यांचा झुंड आजू बाजूला भटकत होतेव त्या परिस्थितिचा भान ठेवत राहुल कोठेकर यांनी रामटेक चे वन अधिकारी RFO शेंडे सर यांच्याशी सव्वाद साधून मृगचा लाहान बाडाला तिथुन मृग विहार रामटेक ला नेण्याचा निर्णय केला नेत असताना बाजूचा शेतात रोडवर्ती JCB चे खोद काम चालू होते JCB चा पावड्यात 6 फूट लांब गवारया विषारी ब्राऊन(कोब्रा) नाग साप निघाला संस्थेचे सर्प मित्रानी त्या सापालाही कोणतीही इजा न होऊ देता त्याला तेथून सुखरूप काढून रामटेक चे राउंड ऑफिसर अंगेंडे साहेब यांचा समक्ष जंगलात सोडण्यात आले व मृगचा बाडाला मृग विहार रामटेक येथे देख रेख रेखीत ठेवण्यात आले आहे.