Published On : Mon, Mar 31st, 2025
By Nagpur Today Nagpur News

पोलीस कोणाला वाचवत आहेत? शिवद्रोही प्रशांत कोरटकरला मदत करणाऱ्यांवर कारवाई की शिवप्रेमींवर?

Advertisement

नागपूर: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कथित पत्रकार प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो अटक टाळण्यासाठी नागपुरातून फरार झाला. आता त्याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या पाच जणांना कोल्हापूर पोलिसांनी नोटीस बजावली असून, लवकरच त्यांच्या अटकेची शक्यता आहे.

यामध्ये प्रशिक पडवेकर, जो कोरटकरचा जवळचा सहकारी मानला जातो, याच्या भूमिकेवर विशेष प्रश्न उपस्थित होत आहेत. पडवेकर हा कोरटकरला गुरु मानतो आणि कोरटकरच्या अटकेवेळी तो सोबत होता, असेही वृत्त आहे. मात्र, याप्रकरणात पोलीस व सरकारची भूमिका संशयास्पद ठरत आहे.

पोलिसांची भूमिका संशयास्पद – अतुल लोंढे यांचा आरोप

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Gold Rate
13 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,41,000/-
Gold 22 KT ₹ 1,31,100 /-
Silver/Kg ₹ 2,64,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

“प्रशिक पडवेकर हा शिवद्रोही प्रशांत कोरटकरचा निकटवर्तीय आहे. तो नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये जातो, पण त्याला प्रशांत कोरटकरला पळून जाण्यास मदत केली याबद्दल विचारण्याऐवजी, पोलिस आमच्यासारख्या शिवप्रेमींवरच गुन्हे दाखल करतात. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे.”

लोंढे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर, भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्याविरोधात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली, असा गंभीर आरोप केला आहे.

“ही सत्ता आणि अरेरावी दाखवण्याची वृत्ती आहे. प्रशिक पडवेकर आणि कोरटकरच्या संबंधांचे पुरावे आमच्याकडे आहेत. लवकरच ते महाराष्ट्रासमोर सादर करू,” असे लोंढे यांनी स्पष्ट केले.

कोरटकरचा फरार कसा शक्य झाला?

पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे की पडवेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कोरटकरला चंद्रपुरात लपण्यास मदत केली, आर्थिक मदत पुरवली आणि तेलंगणामध्ये पळून जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली.

याप्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे चंद्रपूरमधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने कोरटकरला मदतीचा हात दिल्याचा आरोप आहे. हॉटेलमध्ये राहत असताना हा अधिकारी कोरटकरच्या सोबत वारंवार दिसला, असेही वृत्त आहे.

लक्झरी कार जप्त, पण मोठे प्रश्न कायम

कोल्हापूर पोलिसांनी नागपुरात छापा टाकून कोरटकरची आलिशान कार आणि त्याचा सहकारी धीरज चौधरी याची गाडी जप्त केली आहे. या गाड्या कोरटकरने अटकेपासून वाचण्यासाठी वापरल्याचे निष्पन्न झाले आहे.

मात्र, सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की – कोरटकर एवढ्या सहजपणे फरार कसा झाला? त्याला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्यांमध्ये कोणकोण आहेत? आणि महाराष्ट्र पोलीस यावर योग्य कारवाई करतील का, की हे प्रकरण राजकीय हस्तक्षेपामुळे दडपले जाईल?

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement