जय जवान,जय किसान संघटनेने उभा केला प्रश्न,कामगार विमा रुग्णालयाचे भिजत घोंगडे,उदघाटनाच्या दोन वर्षानंतरही परिस्थिती जैसे थे,उपचारा करिता सोमवरीपेठेत व्हावे लागते दाखल
नागपूर:- बुटी बोरी औधोगिक परिसरात विम्याचा दवाखाना होईल असे येथील लोकप्रतिनिधी वारंवार सांगुण येथील जनतेची सदैव बोळवनच केली. पण औधोगिक क्षेत्र स्थापन होऊन आज ३०-३१ वर्षे लोटून गेले तरी आजपर्यंत येथे राज्य कामगार विमा रुग्णालय तयार न झाल्यामुळे कामगार विमा रुग्णालयाची घोषणा हवेतच विरल्या सारखे दिसून येते.
बुटी बोरी औधोगिक क्षेत्र हे पंचतारांकित औधोगिक क्षेत्र असून आशिया खंडात सर्वात मोठे आहे.या औधोगिक क्षेत्रात जवळपास लाखाच्या घरात कामगार काम करीत असून त्यापैकी ३५ हजार कामगार हे विमाधारक (ई एस आय सी) योजनेत समाविष्ठ आहे.कामगार व कारखानदार मिळून ६.५% च्या हिशेबाने या क्षेत्रातून दर महिन्याला अडीच करोड रुपये कामगार विम्याच्या माध्यमातून शासनाला जातो परंतु त्याप्रमाणे सोयी सुविधा त्यांना मिळत नसल्यामुळे कामगार व रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी या इ एस आय सी दवाखान्याला मान्यता दिली.१५ जुलै २०१८ ला केंद्रीय रस्ते,वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे हस्ते बुटीबोरी औधोगिक क्षेत्रात ५ एकर मध्ये भव्य २०० बेडच्या अत्याधुनिक रुग्णालयाचे भूमिपूजन केले.व त्याकरिता १७५ करोड रुपये मंजूरही करण्यात आले.ते अत्याधुनिक रुग्णालय सप्टेंबर २०२० पर्यंत बांधून पूर्ण होईल अशी घोषणा सुद्धा केली.परंतु वास्तव्यात मात्र संबधित रुग्णालयाचे भूमिपूजन होऊन दोन वर्षांचा कालावधी लोटूनही परिस्थिती मात्र जैसे थे असून रुग्णालयाचा मंजूर १७५ करोड रुपयांचा निधी कुठे गेला असा प्रश्न बुटी बोरी येथील जय जवान,जय किसान या सामाजिक संघटनेने आयोजित पत्रकार परिषदेतून उपस्थित केला आहे.
बुटीबोरी औधोगिक वसाहत स्थित शिवतीर्थ येथे जय जवान,जय किसान संघटनेद्वारा आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे केंद्रीय सचिव अरुण वनकर,बुटीबोरी शाखा अध्यक्ष सुरेश गावंडे,उपाध्यक्ष आशुतोष पाठक,सचिव अभिनव फटींग, अजय खिचडे,अभिजित उप्पलवार,विकास मोरे,पंकज गावंडे व विकास शेंडे आदी जण उपस्थित होते.
बुटी बोरी औधोगिक क्षेत्रात अनेक कंपन्या असून येथे कुठल्या ना कुठल्या कंपनीत दररोज अपघात होत असते.दिवसाला अपघात झाला तर बुटी बोरी येथील कामगार रुग्णालयात नेले जाते.परंतु अपघात गंभीर स्वरूपाचा असेल तर त्याला नागपूर येथील सोमवारी पेठेतच दाखल करावे लागते. आणि हा ३० किलोमीटरचा प्रवास करता करता रुग्ण रस्त्यातच अनेकदा दगावल्याचे खूप सारे उदाहरणे नजरेसमोर आहे.तसेच औधोगिक क्षेत्रातील कुठल्याही कंपनीत काम करणारे कामगार आजारी पडले की,त्याला ३० किलोमीटर वरील सोमवारी पेठ येथे दाखल करावे लागते. परंतु या विमाच्या रुग्णालयाची स्थिती फारच दयनीय आहे.विदर्भातील तीन लाख कामगार व त्यांच्या कुटुंबांना उपचार देण्याकरिता हे एकमेव कामगार रुग्णालय असून येथे डॉक्टर,नर्ससह कर्मचाऱ्यांचा वानवाच आहे. येथे डॉक्टर,तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांची २५० पदे मंजूर आहेत.परंतु प्रत्यक्षात मात्र सर्वच आलबेल आहेत.
त्याचप्रमाणे या रुग्णालयात उपचाराच्या अत्याधुनिक साधनांचा अभाव आहे.येथे उपचारा करिता येणाऱ्या रुग्णाची संख्या बघता औषध व उपचारा करीता ताटकळत बसावे लागत असल्याने कामगारांना रुग्णालयात दिवसभर सुटी घेऊनच थांबावे लागते.यामुळे कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागतो.हीच बाब लक्षात घेता अत्याधुनिक यंत्रासामुग्रीने सुसज्ज असे कामगार रुग्णालग बुटी बोरी कामगार परिसरात व्हावे अशी मागणी जय जवान,जय किसान संघटनेने पत्रकार परिषदेतून केली आहे.
– संदीप बलवीर,बुटीबोरी,तालुका प्रतिनिधी