Published On : Tue, Sep 5th, 2017

चारपदरी महामार्गावरीव वराडा, वाघोली बस स्टापवरील बोरवेल कधी बनणार ?

कन्हान/नागपुर :नागपूर जबलपूर राष्ट्रीय चारपदरी महामार्गवरील वराडा व वाघोली बस स्टापवरील बोरवेल चारपदरी रस्ता निर्माण कामात ओरियंटल कंपनी व्दारे तोंड़ण्यात आल्या परंतु चार वर्षाचा कालावधी लोटला असुन सुध्दा अद्याप नविन बोरवेल बनविण्यात आली नसल्याने गावकरी व प्रवाशांनचे वराडा व वाघोली बस स्टाप वरील नविन बोरवेल कधी बनविण्यात येणार याकडेच लक्ष लागले आहे.

वराडा व वाघोली बस थांब्याजवळपास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने येणा-या जाणा-या प्रवाशांनच्या पाणी पिण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या साहयाने बोरवेल बनविण्यात आल्या होत्या परंतु ओरियंटल कंपनी व्दारे नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग चारपदरी रस्ता निर्माण कामात या दोन्ही बोरवेल रस्तात आल्याने नविन बनविण्यात येईल म्हणुन त्या तोंड़ण्यात आल्या तेव्हा पासुन शाळेतील विद्यार्थी, प्रवाशी, गावकरी हयाना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ओरियंटल कंपनीला ग्राम पंचायत व्दारे वारंवार नविन बोरवेल बनविण्याची मागणी करून सु़ध्दा अद्याप पर्यत नविन बोरवेल न बनविण्यात आल्याने दोन्ही बस थांब्यावर शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, प्रवाशी, गावक-यांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. यामुळे वराडा व वाघोली बस थांब्यावरील नविन बोरवेल कधी बनविण्यात येईल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.