नागपूर : विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभा निवडणुकीवर निवडून आल्यानंतर त्यांना महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
त्यामुळे आता राज्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा निवडला जाणार आहे.मात्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षाची निवड कधी होणार? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेमहत्त्वाची माहिती दिली.
दीड कोटी सदस्य संख्या असलेला आमचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात जनता भाजपचा सदस्यत्व घेण्यासाठी आमच्याकडे येत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आता आम्ही सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी पूर्णपणे झोकून देणार आहोत.
भाजपची सदस्यता मोहीम आटोपल्यानंतर प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती केली जाणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.