Published On : Tue, Mar 27th, 2018

या सरकारचं काय चाललंय ? – अजित पवारांचा सरकारला संतप्त सवाल

Ajit Pawar
मुंबई: आमचे अंतिम आठवडयात तीन प्रस्ताव आहेत मात्र आज कहरच झाला आहे. आमच्या हक्काचा २९३ चा प्रस्ताव असताना उत्तर दयायला कुणीही राज्यमंत्री किंवा मंत्री हजर नाहीत यावर विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारचं काय चाललंय असा संतप्त सवालही केला.

बिले दाखवल्यानंतर सभागृहाची परवानगी घ्यायची असते.आम्ही सहकार्य करुनही आज कहरच झाला. अंतिम आठवडयात आमचे तीन प्रस्ताव आहेत.आम्हाला कायदा व सुव्यवस्थेवर बोलायचे आहे. विरोधकांचा हक्काचा २९३ चा प्रस्ताव असतो. अध्यक्ष आपल्याकडून न्यायाची प्रतिक्षा आहे.परंतु सरकारचे बेजबाबदार काम सुरु आहे, दुर्लक्षित काम सुरु आहे. मंत्री,राज्यमंत्री आज सभागृहात हजर नाहीत.याचं उत्तर कोण देणार आहे असा सवालही केला.

दरम्यान सभागृहातील कोरम आणि मंत्र्यांनी सभागृहात उपस्थित रहायला हवे. ते टाळता येणार नाही असे उत्तर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अजित पवारांनी विचारलेल्या प्रश्नाला दिले.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement