नागपूर : पारडी येथील एका ऑटो चालकाला सार्वजनिकपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या कोलकाता येथील आर. जी. कर हॉस्पीटल आणि मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून संतापाची लाट उसळली आहे. याच घटनेचा दाखला देत ऑटोचालकाने तरुणीला धमकी दिली. त्यानंतर वाद झाला आणि नागरिकांनी ऑटोरिक्षा चालकाला मारहाण केली. मात्र या व्हायरल व्हिडीओ मागचे तथ्य काय ? नागपूर पोलिसांनी यावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण का दिले नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पीडित मुलीचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे त्याचे काय ? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर वर आला आहे. दोन दिवसांपूर्वी नागपुरात ऑटोमध्ये बसून लकडगंज भागातून पारडीला जात असताना एका तरुणीशी ऑटोचालकाने गैरवर्तन केल्याची घटना समोर येत आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या कोलकाता येथील आर. जी. कर हॉस्पीटल आणि मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून संतापाची लाट उसळली आहे. याच घटनेचा दाखला देत ऑटोचालकाने तरुणीला धमकी देण्यास सुरुवात केली.
हा वाद चिघळल्या नंतर हिम्मतीने तरुणीने ऑटो थांबवित आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे स्थानिक नागरिक जमले आणि तरुणीने ऑटोचालकाच्या गैरवर्तनाविषयी नागरिकांना माहिती दिली. त्यांनतर नागरिकांनी ऑटोचाकाला चांगलाच चोप देत त्याला पारडी पोलिसांच्या हवाली केले.
पोलिसांकडून अद्यापही स्पष्टीकरण का नाही?
पारडी येथील एका ऑटो ड्रायव्हरला सार्वजनिकपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेमके हे प्रकरण काय होते.या व्हायरल व्हिडीओमागील सत्यता काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मात्र नागपूर पोलिसांकडून अद्यापही यावर कोणतेच स्पष्टीकरण समोर आलेले नाही.
सोशल मीडिया प्रभावकाचे काय, ज्याने पीडितेचा चेहरा दाखवला?
भारतीय कायद्यानुसार पीडितेची ओळख जाहीर करता येत नाही. इतकंच काय तर छळ किंवा साशंकता असतानाही पीडितेची ओळख जाहीर करणे कायद्यानुसार चुकीचे आहे. मात्र तरी देखील सोशल मीडिया प्रभावकांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये पीडित मुलगी स्पष्टपणे दिसत आहे. मात्र तरी देखील पोलिसांनी व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या विरोधात कोणतीच कारवाई केली नाही.