Published On : Fri, Mar 19th, 2021

खाजगी बसेस व शासकीय बसेस मध्ये प्रवासी क्षमतेची तफावत कां ? : आ.कृष्णा खोपडे

खाजगी बसमालकाची परिस्थिती पाहता सरकारने मदत करावी किंवा त्यांना धंदा करण्याची सवलत द्यावी.

नागपूर : नागपुरात लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे व राज्यात लावलेल्या निर्बंधामुळे खाजगी बसमालकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून यांना मदत करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने यांना अर्थसहाय्य करावे किंवा यांना धंदा सुरु करण्याची सवलत द्यावी, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे. तसेच शासकीय बसेस 100 टक्के प्रवासी क्षमतेने सुरु असून त्याकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. मात्र खाजगी बसेस मध्ये 50 टक्केच्या वर थोडेफार जरी प्रवासी दिसले तर त्यांना दंड लावल्याशिवाय राहत नाही. ही तफावत योग्य आहे काय? तेव्हा प्रशासनाने दया-माया दाखवून या बुडत्या व्यवसायाला हातभार लावावा, अशी विनंती आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रशासनाला केली आहे.

खाजगी बसचे एक शिष्टमंडळ आमदार कृष्णा खोपडे यांना भेटले व त्यांनी दिलेल्या निवेदनात सांगितले की, Covid-19 महामारी मुळे मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन सम्पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारत भरात लावण्यात आला, अचानक पणे सर्व व्यवहार बंद झालेत त्यात खासगी(तंत्राटी) बस वाहतूक सुद्धा बंद झाली. अश्या परिस्थीतीत बस मालकांवर मोठे संकट ओढावल्या गेले आहे. कसे तरी डिसेबर महिन्यात गाड़ी चे चाक फिरन्यास सुरुवात झाली तर इकडे आता पुन्हा लॉकडाऊन सुरु झाले, आता तर बस मालकाला जगावे की मरावे असे झाले आहे. कारण डिसेम्बर-जानेवारी महिन्यात नुकताच सुरु झालेला धंदा लक्षात घेता वर्षभर उभ्या असलेल्या बसेस ला उधार उसने करून खर्च लावून तयार केल्या, आणि वास्तविक परिस्थीती लक्षात घेता हे सर्व पुन्हा एकदा बंद झाले. या मुळे आता बस मालक ना गाड़ी चा टैक्स भरु शकणार, ना वाहन कर्जाचे मासिक हप्ते भरु शकणार, वर्षाकाठी बस ला लागणारा इन्शुरन्स 60ते70 हजारांज्या घरात जातो तो सुद्धा भरण्याची आता परिस्थीती राहिली नाही.

मागील वर्षीप्रमाणे यावर्षी राज्य सरकार ने सरसकट 50% कर (TAX) माफी करावी
पर्यटना सम्बंधित व्यवसाय करणाऱ्या अनुभवी व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, महामारीच्या भितीने या वर्षी (2021) सुद्धा पर्यटनाला प्रतिसाद नसणार, लोक महामारिच्या भीतीने घरा बाहेर पडणार नाहित अश्या वेळी बस मालकाने आपला उदरनिर्वाह कसा करावा, प्रपंच कसा चालवावा असा प्रश्न पडला आहे.

गतवर्षात परिवहन विभागाच्या समन्वयाने राज्य सरकार ने सरसकट 50% कर (TAX) माफी करून दिली परंतु आत्ताची परिस्थीती लक्षात घेता बूडत असणाऱ्याला काडी चा आधार या प्रमाणे 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधी साठी खासगी बसेस चा टैक्स माफ करण्याची आवश्यकता आहे. नाही तर काही दिवसांनी आपल्या शहरात रंगेबीरंगी फिरत दिसणा-या लक्ज़री बसेस नजरे समोरून जातांना आपल्याला कधीच दिसणार नाहीत.