Published On : Fri, Oct 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

क्रेन कशामुळे कोसळली? दोन मजुरांचा झालेला मृत्यू तांत्रिक तपासणीनंतरच स्पष्ट होणार; DCP राहुल मदनेंची माहिती

Advertisement

क्रेन कशामुळे कोसळली? दोन मजुरांचा झालेला मृत्यू तांत्रिक तपासणीनंतरच स्पष्ट होणार; DCP राहुल मदनेंची माहिती

नागपूर : कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि हाताला काम मिळवून घरच्यांना आधार देण्यासाठी दोन मजूर आपल्या गावापासून दूर नागपुरात आले होते. मात्र, एका भीषण दुर्घटनेने त्यांचा प्रवास कायमचा संपला. कॉटन मार्केट चौकातील म्हाडा कॉलनी परिसरात शुक्रवारी सकाळी टॉवर क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू झाला, तर अन्य दोन जण जखमी झाले. या घटनेची माहिती पोलीस उपायुक्त (DCP) राहुल मदने यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बांधकाम सुरू असताना क्रेन ऑपरेटरसह चार मजूर काम करत होते. याचवेळी अचानक टॉवर क्रेन कोसळली. या भीषण दुर्घटनेत भंडारा येथील विश्वनाथ कटाने आणि उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील मुकेश निषाद यांचा मृत्यू झाला. तर झारखंडमधील दोन मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर ओरिएंट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या बांधकामाचे कंत्राट विजय शिरके कंपनीकडे आहे. दुर्घटनेच्या वेळी कामगार क्रेनच्या कोणत्या भागात होते आणि क्रेन नेमकी कशामुळे कोसळली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. संबंधित विभागाच्या मेकॅनिकल अभियंत्यांकडून क्रेनची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे. तसेच बांधकाम कंपनी, देखरेख करणारे अधिकारी आणि संबंधित अभियंत्यांकडूनही माहिती घेतली जाणार आहे.

या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे DCP राहुल मदने यांनी सांगितले. दरम्यान, दोन मजुरांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोजीरोटीसाठी घरापासून दूर आलेल्या कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न या दुर्घटनेनंतर पुन्हा उपस्थित झाला आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.