Published On : Sat, Apr 14th, 2018

मेट्रोच्या अत्यावश्यक कामांमुळे धंतोलीसह काही भागात सोमवारी सकाळी वीज नाही

Bulb

Representational pic


नागपूर: नागपूर मेट्रोला करावयाच्या अत्यावश्यक कामांमुळे महावितरणतर्फ़े सोमवार दि. 15 एप्रिल 2018 रोजी महावितरणच्या कॉग्रेसनगर विभागांतर्गत असलेल्या धंतोली तर महावितरणतर्फ़े करण्यात येणा-या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी शंकरनगर, धरमपेठ, जयप्रकाशनगर आणि त्यासभोवतालच्या परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महावितरणतफ़े देण्यात आली आहे.

मेट्रोच्या कामांमुळे सोमवारी सकाळी 8 ते दुपारी 11 या वेळेत श्याम पॅलेस, मेडीकल कॉलनी, प्रियंका अपार्टमेंट, हम्पीयार्ड रोड, अजनी रेल्वे स्टेशन, हॉटेल ग्रीन सिटी, शिवाजी सायन्स कॉलेज, हयात एन्क्लेव्ह, ऑल इंडिया रिपोर्टर, कॉंग्रेस नगर, नीलगंगा अपार्टमेंट. धंतोली, छोटी धंतोली या भागातील वीज पुरवठा बंद राहणार असून याचवेळेत यशवंत स्टेडियम, मेहाडीया चौक, शंकरनगर, दंडीगे लेआऊट, काचीपुर, आरसीएफ, खरे टाऊन, धरमपेठचा व भगवाघर लेआऊटचा काही भाग, नागपूर नागरीक रुग्णालय आणि जवळपासच्या परिसरातील वीजपुरवठा महावितरणतर्फ़े केल्या जाणा-या अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे बंद राहील.

याशिवाय सकाळी 7 ते 11 या वेळेत इंद्रप्रस्थ, पाटील लेआउट, भेंडे लेआउट, पन्नासे लेआऊट, एचबी इस्टेट, सोनेगाव वस्ती, सहकारनगर, गजाननधाम, जयप्रकाशनगर, चिंतामणीनगर, राजीवनगर, तपोवन कॉम्प्लेक्स, राहुलनगर, नरकेसरी लेआउट, श्यामनगर, पॅराडाइज सोसायटी या भागातील वीजपुरवठा देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी बंद राहील

Advertisement

वीज बंद असल्याची पुर्वसुचना महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या या भागातील वीज ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून देण्यात येणार असून ग्राहकांनी यावेळेत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement