नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती विरेंद्र उर्फ विक्की कुकरेजा यांचे स्वागत मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले.
मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी स्थायी समिती सभापतींच्या कक्षात जाऊन श्री. विक्की कुकरेजा यांची सदिच्छा भेट घेतली. स्थायी समिती सभापतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले, माजी अपर आयुक्त व एनईएसएलचे संचालक डॉ. आर. झेड. सिद्दीकी, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, प्रफुल्ल फरकासे, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, राजू मेश्राम आदी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त अश्विन मुदगल यांनी स्थायी समिती सभापती विक्की कुकरेजा यांच्यासोबत मनपाच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा केली. मनपाकडे शासनाकडून येणे असलेला निधी व तसेच शासकीय कार्यालयांकडे करापोटी बकाया असलेल्या रकमेच्या वसुलीबाबत तसेच अन्य विकासकामांसंदर्भात आयुक्तांनी चर्चा केली.