Published On : Mon, Sep 25th, 2017

महा.अंनिस जनजागृती प्रबोधन यात्रेचे कन्हान ला स्वागत.

कन्हान :महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती उत्तर नागपूर शाखेच्या वतीने अंनिस जनजागृती “प्रबोधन यात्रा “चे आयोजन करण्यात आले होते. ही प्रबोधन यात्रा कन्हान शहरात आल्यावर स्वागत करून कन्हान बौध्द विहारात जनजागृतीपर प्रबोधन करण्यात आले.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती उत्तर नागपूर शाखेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रविवार ला मा. मिलींद गोडाणे गुरूजी, व्हि एस गणवीर, सामाजिक कार्यकर्ता संजय शेंडे राज्य सरचिटणीस, जगजीत सिंग जिल्हा अध्यक्ष महा. अंनिस महेंद्र भोगे, रवी सहारे नरेश महाजन,आंनद मेश्राम, पुष्पाताई बोंदाळे, सरला गजभिये, जयश्री फोपरें, मंजुश्री फोपरे यांचे प्रमुख उपस्थितीत शहीद स्मारक इंदोरा नागपूर येथुन वीस कारच्या ताफ्यासह महा.

अंनिस जनजागृती “प्रबोधन यात्रा” ची सुरूवात करून कामठी वरून कन्हान शहरात येताच डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबाच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून जयघोष करण्यात आला. तदंनतर कन्हान बौध्द विहारात बुध्दिष्ट वेलफेअर सोसायटी च्या पदाधिका-यांनी आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी चिकित्सक बुध्दी, निर्भयवृत्ती, विञानवादी प्रवृत्ती आत्मसात करून मानवाच्या उन्नती करिता समाजातील वाईट प्रथा, अंधश्रध्दा, अंध्दविश्वास, बुवाबाजी नष्ट कराव्यात असे भावनिक मार्गदर्शन मान्यवरांनी केले.

प्रबोधन यात्रेकरूना अल्पोहार चाय वितरण करून मनसर, रामटेक करिता वीस कारांचा ताफा प्रस्थान झाला.,, अंनिस जनजागृती प्रबोधन यात्रेच्या स्वागतीय कार्यक्रमाच्या यशस्विते करिता भगवान नितनवरे,कृष्णराव चहांदे, पुडलिकजी मानवटकर, विनायक वाघधरे, संभाजी उके, दौलत ढोके, नरेश चिमणकर, दिलीप डोंगरे, दिनेश ढोके, रामेश्वर सवाईतुल व बुध्दिष्ट वेलफेअर सोसायटी तसेच कन्हान बुद्ध विहार च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी मोलाचे सहकार्य केले.