Published On : Mon, Mar 16th, 2020

काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रीचे स्वागत

कन्हान : – वाय एस आर कॉग्रेस पार्टी चे कार्यकर्ता पडाला रमेश मु काकीनाडा आंधप्रदेश यांचा काश्मीर ते कन्याकुमारी सायकल दौरा करित असताना कन्हान येथे स्वागत करून अण्णा वस्ती चांपा (वराडा) येथे मुक्काम व भव्य स्वागता सह प्रस्थान करण्यात आले.

वाय एस आर कॉग्रेस पार्टी चे कार्य कर्ता पडाला रमेश मु काकीनाडा आंध प्रदेश हयानी प्रण केला होता की आंध प्रदेश चे मुख्यमंत्री जगन रेड्डी होतील तर मी काश्मीर ते कन्याकुमारी सायकल दौरा करेल तो प्रण पुर्ण करित असताना कन्हान येथे किसान कॉग्रेस कमेटी नाग पुर जिल्हा अध्यक्ष ओमप्रकाश काकडे हयांनी स्वागत केले.

जवळच असलेल्या चांपा (वराडा) येथील अण्णा च्या वस्ती मध्ये रात्री मुक्काम करून शनिवार (दि.१४) ला सकाळी कन्हान ला भव्य स्वाग त करून पुढील प्रवाशाच्या शुभेच्छा देऊन नागपुर मार्गे कन्याकुमारी कडे सायकलने प्रस्थान करण्यात आले.


हा प्रवास ४ हजार ५०० कि.मी. असल्या ने किसान कॉग्रेस कमेटी नागपुर जिल्हा अध्यक्ष ओमप्रकाश काकडे, भास्कर रेड्डी, मोहनजी काकडे, शिवाकृष्णा वाकलपुडी, लक्ष्मीकांत काकडे, रमेश रेड्डी, सुरज करंडे, राजा भाई, सलीम भाई, राकेश वाघमारे आदी उपस्थित होते.