Published On : Mon, Jul 27th, 2020

रोल ऑफ कॉलेजेस इन प्रिव्हेंटिंग व्हॉयलन्स अगेंस्ट वूमन” वर आयोजित वेबिनार संपन्न

नागपुर: सी.पी. & बेरार कॉलेज, नागपुर आणि सेंटर फॉर विमेन स्टडीज, राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि वी फॉर चेंज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वेबिनार- रोल ऑफ कॉलेजेस इन प्रिव्हेंटिंग व्हॉयलन्स अगेंस्ट वूमन दिनांक 27 जुलै 2020 रोजी दुपारी 12 वाजता संपन्न झाला.

या वेबिनारला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ नीलेश भरणे, अप्पर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा हे लाभले होते.

शाळा, कॉलेज आणि पोलीस प्रशासन मिळून विद्यार्थ्यांना समुपदेशन, मार्गदर्शन करून सुरक्षित वातावरण कसे निर्माण करू शकतात हे त्यांनी सविस्तर सांगितले. तसेच महिलांसाठी पोलीस प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शुभदा संख्ये, पी. आय., भरोसा सेल, यांनी दिली.


प्रमुख वक्त्या डॉ. श्रुती तांबे, समाज शास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे आणि रेणुका कड, विकास अध्ययन केंद्र,मुंबई या लाभल्या होत्या. या वेबिनारमध्ये 1700 पेक्षा जास्त लोकं सहभागी झाले. यात प्रामुख्याने प्राध्यापक, पत्रकार, वकील, एन. जी. ओ. मांबर्स व विद्यार्थी सहभागी होते.

कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक डॉ. स्नेहा देशपांडे, एच.ओ.डी., सेंटर फॉर विमेन्स स्टडीज यांनी प्रास्ताविक दिले. डॉ. मिलिंद बारहाते, प्राचार्य सी.पी. अँड बेरार कॉलेज यांनी समारोप केला.
डॉ. रश्मी पारसकर यांनी आभारप्रदर्शन केले.