Published On : Fri, Feb 22nd, 2019

‘आम्ही भारताचे लोक’ मेगा म्युझिकल शो शनिवारी

नागपूर महानगरपालिका व अस्तित्व फाऊंडेशनचे आयोजन

नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने आयोजित व बोधी फाउंडेशनतर्फे प्रस्तुत‘आम्ही भारताचे लोक’ या मेगा म्युझीकल शो चे शनिवारी (ता.२३) आयोजन करण्यात आले आहे. प्रभाग ३३ मधील बॅनर्जी ले-आउट परिसरातील भगवान नगर मैदानात सायंकाळी ६ वाजता या गीत नाट्य निवेदनाच्या महासंग्रामाला सुरूवात होईल.

शनिवारी (ता.२३) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उर्जा व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर नंदा जिचकार भूषवतील.

यावेळी दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार नागो गाणार, आमदार प्रकाश गजभिये,आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार अनील सोले, आमदार गिरीश व्यास, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख, उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलींद माने,उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेता संदीप जोशी, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, ब.स.पा. पक्ष नेता मोहम्मद जमाल, रा.काँ. पक्ष नेता दुनेश्वर पेठे, शिवसेना पक्ष नेता किशोर कुमेरिया, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती नागेश सहारे, धंतोली झोनच्या सभापती विशाखा बांते,कार्यक्रमाच्या आयोजन नगरसेविका वंदना भगत, नगरसेविका भारती बुंडे, नगरसेवक मनोज गावंडे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश मोहिते, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त स्मिता काळे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

‘आम्ही भारताचे लोक’ या मेगा म्युझीकल शो ला बहुजन रिपब्लिकन एकता मंच आणि निर्धार महिला व बालविकास समितीचे सहकार्य लाभले आहे.