– ग्वालीयर मराठी भाषा समाजाच्या दसरा मेळाव्यात सुनील केदारांचा घनघणात
– माझी भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. व मी छत्रपतींचा एक मावळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक वेळ चुकीला माफी दिली परंतु विश्वासघाटाला माफी दिली नाही म्हणून आपण सुद्धा विश्वासघाती विचारधारेला मुळासकट उपटून फेकून टाकून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श निर्माण करा असे घनघणाती विचार महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले. ग्वालीयर येथील मराठी भाषी समाजच्या वतीने आयोजित दसरा मेळाव्यात सदर विधान सुनील केदार यांनी व्यक्त केले.
मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीत च्या दरम्यान ग्वालीयर व मुरैना जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील जबाबदारी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सुनील केदार यांच्यावर टाकली आहे. त्या जबाबदारी मुळे केदार यांनी दोन्ही जिल्ह्यातील मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे.
ग्वालीयर भागात अनेक मराठी भाषी कुटुंब असल्यामुळे तेथे मराठी भाषी समजा तर्फे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सुनील केदार यांनी आपल्या वक्तव्यात काँग्रेसी विचारधारा या देशाला तारक असल्याचे मत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आदर्श आहे.
छत्रपतींच्या जीवनकाळात महाराजांनी अनेकदा चुकीला माफी दिल्याची पावती आहे परंतु ज्यांनी स्वराज्याचा विश्वासाला तडा दिला त्यांना मात्र कधीच
शिवाजी महाराजांनी माफी दिली नाही आहे. छत्रपतींच्या संपूर्ण जीवनाचा अभ्यास केल्यास त्यांनी कधीच विश्वासघात सहन केला नाही. म्हणून आपण सुद्धा छत्रपतींचे मावळे म्हणून या पोटनिवडणुकीत विश्वासघाताला उत्तर द्यावे असे मत सुनील केदार यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्वालीयर दक्षिण चे आमदार प्रवीण पाठक व मोठ्या प्रमाणात ग्वालीयर येथील मराठी भाषिक समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.