Published On : Fri, Oct 29th, 2021

वेकोलिच्या अधिका-यांनी घेतली मनपा अतिरिक्त आयुक्तांची भेट

नागपूर: वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (वेकोलि)च्या अधिका-यांनी नुकतीच मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना यांची भेट घेतली. २६ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या सतर्कता जागरूकता सप्ताहाच्या अनुषंगाने सदर भेट घेण्यात आली.

यावेळी वेकोलिचे महाप्रबंधक (सतर्कता) संजीव शेंडे, जनसंपर्क सल्लागार एस.पी. सिंह मुख्य प्रबंधक (सिस्टीम) कमलेश बन्सोड, उपप्रबंधक (कार्मिक) राहुल नवानी यांनी अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना यांची भेट घेउन त्यांना वेकोलितर्फे सतर्कता सप्ताह अंतर्गत चालणा-या उपक्रमाची माहिती दिली.

या भेटी दरम्यान वेकोलिच्या अधिका-यांमार्फत मनपा कर्मचा-यांकरिता मास्क, सॅनिटायजर व पेन देण्यात आले. या सर्व वस्तूंवर ‘स्वतंत्र भारत@75 : सत्यनिष्ठा से आत्मनिर्भरता’ असे नमूद आहे.