Published On : Fri, Oct 29th, 2021

शासकीय तंत्रनिकेतन नागपूर द्वारे वस्त्रोद्योग क्षेत्रामधील नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार प्रशिक्षण

प्रक्षिशणा संदर्भात सामंजस्य करार

नागपूर : शासकीय तंत्रनिकेतन नागपूर द्वारे वस्त्रोद्योग क्षेत्रामधील नामांकित कंपन्यांमध्ये वस्त्रोद्योग विभागाच्या पदविकाधारक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल सोबतच त्यांना या प्रकल्पामध्ये कामाचा अनुभव मिळणार असल्याची माहिती शासकीय तंत्रनिकेतनच्या वस्त्रोद्योग पदविका विभागाचे प्रमुख डॉ. सी.पी. कापसे यांनी दिली आहे.

Advertisement

शासकीय तंत्रनिकेतन नागपूरच्या वतीने 27 वस्त्रोद्योगाचा एक उद्योग मेळावा आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी 16 उद्योजक या मेळाव्यात प्रत्यक्ष सहभागी झाले होते .याप्रसंगी गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक नागपूर तसेच गौतम मागासवर्गीय सहकारी सुत गिरणी पारशिवनी यांच्यामध्ये विद्यार्थ्याच्या प्रशिक्षणा संदर्भात एक सामंजस्य करार सुद्धा करण्यात आला.

या उपक्रमामुळे उद्योग समूहांना तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध होणार असून सदर प्रशिक्षण हे 15 नोव्हेंबर पासून चालू होणार आहे एकूण २७ विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी टेक्स्टाईल कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यातर्फे टेक्सटाईल इंडस्ट्रीजमध्ये हे निशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. कापसे यांनी दिली. कृषी नंतर सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारे वस्त्रोद्योग हे क्षेत्र आहे. शासकीय तंत्रनिकेतनच्या वस्त्रोद्योग विभागात 30 विद्यार्थी प्रवेश क्षमता असून हा विभाग 1982 पासून कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली .

यावेळी वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजक, तंत्रनिकेतनचे शिक्षक आणि पदविकेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement