Published On : Wed, Sep 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

मुलांच्या वादातून नागपुरात रक्तरंजित हाणामारी; लोखंडी रॉडच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

वाठोडा पोलिसांकडून पती-पत्नीसह तिघांना अटक
Advertisement

मुलांच्या वादातून नागपुरात रक्तरंजित हाणामारी; लोखंडी रॉडच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुलांच्या वादातून झालेल्या भांडणाला हिंसक वळण लागले. लोखंडी रॉडने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीसह तिघांना अटक केली आहे.

ही घटना २१ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास खरबी येथील मानवशक्ती लेआउट परिसरात घडली. मृताची ओळख शहाबाज इशाक शेख अशी झाली आहे.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांच्या माहितीनुसार, मुलांमध्ये झालेल्या वादावरून शहाबाज आणि आरोपींच्या कुटुंबीयांमध्ये वाद झाला. यानंतर आरोपींनी शहाबाज यांच्यासोबत मारहाण केल्याचा आरोप आहे. दोन आरोपींनी लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे.

गंभीर जखमी शहाबाज यांना मेडिकल रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, २२ सप्टेंबर रोजी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Advertisement

यानंतर वाठोडा पोलिसांनी हत्या प्रकरणात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात ३५ वर्षीय वाहिद अन्सारी याला सुरुवातीला अटक करण्यात आली. त्यानंतर फरार असलेले इमरान अन्सारी आणि त्यांची पत्नी रुबीना अन्सारी यांनाही पोलिसांनी अटक केली.

मुलांच्या किरकोळ वादातून सुरू झालेला वाद अखेर तरुणाच्या मृत्यूपर्यंत पोहोचला. या प्रकरणाचा पुढील तपास वाठोडा पोलीस करत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.