Published On : Tue, Aug 1st, 2017

पाणीकर थकबाकीदारांवर आता होणार ‘नळजोडणी खंडित’ करण्याची कडक कारवाई, थकबाकीदारांची मालमत्ता पण जप्त करणार

Advertisement


नागपूर:
नागपूर महानगरपालिका आणि OCW, १७ जुलै ते ७ ऑगस्ट यादरम्यान राबवत असलेल्या ‘पाणीकर अभय योजने’ नंतर आता अशा थकबाकीदारांवर सक्त कारवाईचा बडगा उगारण्यासाठी नागपूर महानगर पालिका सज्ज झालेली आहे.

पाणीकर थकबाकीदारांच्या घरांवर सार्वजनिक रित्या विशेष खुणा करणे , थकबाकीदारांच्या घरावर धडक देऊन कर-वसुली करने आणि ७ ऑगस्ट नंतर थकबाकीदारांच्या घरांवर सरळ नळजोडणी खंडित करण्याची कारवाई करणे तसेच ज्या थकबाकीदारांची नळजोडणी आधीच बंद करण्यात आलेली आहे मात्र त्यानंतरही ज्यांनी थकबाकी चुकवलेली नाही अशांवर आता वॉरण्ट कारवाई व त्याहीपुढे जाऊन मालमत्ता (TV/Refrigerator) जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे .

येथे उल्लेखनीय आहे कि, नागपूर महानगरपालिका पाणी व मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी दि. १७ जुलै ते ७ ऑगस्ट या काळात अभय योजना राबवत आहे. या दरम्यान आपली थकबाकी पूर्ण भरणाऱ्या ग्राहकांना विलंब शुल्क माफ करण्यात येत आहे. नागरिकांना या दिलास्यातून थकबाकी भरण्यासाठी प्रोत्साहित करावे या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या या योजनेला थकबाकीदारांनी अजून अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे यापुढे कठोर कारवाई करूनच ही थकबाकी वसूल करण्याचा आपला मानस मनपाने केला आहे.

आता मनपा-OCW ने प्रत्येक झोनमध्ये एक अशा दहा चमू विशेषत: या कामासाठी गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या चमू थकबाकीदारांच्या घरांवर सार्वजनिक रित्या विशेष खुणा करून ठेवतील. जेणेकरून पुढील कारवाई तसेच उपरोक्त व्यक्तीचे घर हे पाणीकर थकबाकीदारांचेक आहे हे सर्वाना लक्षात येईल आणि जलदगतीने कारवाई करणे शक्य होईल.