Published On : Sun, Sep 3rd, 2017

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘संकल्प स्वच्छतेचा- स्वच्छ महाराष्ट्राचा’ या विषयावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. ५ सप्टेंबर २०१७ रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक संजय भुस्कूटे यांनी घेतली आहे.

राज्यात दि. २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत ‘संकल्प स्वच्छतेचा – स्वच्छ महाराष्ट्राचा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश, अभियानाचे वेगळेपण, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि लोकांचा या अभियानात मिळत असलेला सहभाग, गाव ते राज्यस्तरापर्यंत स्वच्छतेच्या उपक्रमात असलेला कामाचा उत्साह, अभियानाला मिळत असलेले अभूतपूर्व यश आणि शासन करत असलेला प्रयत्न या सर्व विषयावर सविस्तर माहिती श्री. लोणीकर यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.