Published On : Wed, Apr 10th, 2019

अमळनेर येथे भाजप-शिवसेनेच्या मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना मारहाण

अमळनेर येथील भाजप- शिवसेनेच्या मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना मारहाण करण्यात आली.

जळगाव – अमळनेर येथील भाजप- शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये जोरदार राडा झाला. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना मारहाण करण्यात आली. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांच्यातही हाणामारी झाली. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.