Advertisement
नागपूर : कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या लसीकरण हा एकमेव उपाय आहे. मात्र लसीचा तुटवडा बघता लस उपलब्ध व्हावी या हेतूने माझ्या वॉर्ड निधीतून 15 लाख रुपये घेण्यात यावे, अशी विनंती करणारे पत्र स्थापत्य समितीचे सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी महापौर दयाशंकर तिवारी यांना दिले. महापौरांनी आग्रह केल्यानंतर निधी देणारे ते पहिले नगरसेवक आहेत.
अनेकांचा पहिला डोज झाला; लस उपलब्ध नसल्याने त्यांना दुसऱ्या डोज साठी प्रतीक्षा करावी लागत आहे. नागरिकांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय होऊ नये यासाठी लस उपलब्ध करण्याच्या दृष्टीने वॉर्ड निधीतून 15 लाख रुपयांच्या निधीचा उपयोग करावा, अशी विनंती या पत्राद्वारे केली आहे.