Published On : Sat, May 8th, 2021

शहरासाठी रेल्वे मार्गाने ऑक्सिजनचे ४ टँकर पोहोचले

शनिवारी एकूण १६९ मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा
नागपूर जिल्हयाला आज ३ हजार ८६७ रेमडेसिवीर प्राप्त
कोरोना प्रतिबंधात्मक २९ हजार लसीची नवीन खेप प्राप्त

नागपूर: कोरोना संसर्ग काळामध्ये जीवनदायी ठरलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वायुदल व रेल्वेच्या मदतीने ओडीसा राज्यातून चार ऑक्सिजन टँकर शहरात पोहोचले आहे. 58 मेट्रिक टन ऑक्सिजनचा अतिरिक्त पुरवठा आज झाला आहे. आज शनिवारी एकूण १६९ मेट्रीक टन पुरवठा करण्यात आला. ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी तातडीच्या पुरवठयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Advertisement

दोन दिवसापूर्वी वायू दलाच्या विशेष विमानाने चार टँकर ओडीसाची राजधानी असलेल्या भुवनेश्वर नजीकच्या अंगुळ येथील स्टील प्लांटसाठी रवाना करण्यात आले होते. ७ मे च्या रात्री तीन वाजता रेल्वे स्थानकावर हे चारही टँकर प्राप्त झाले आहे. भिलाई येथून होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठा व्यतिरिक्त हा ऑक्सिजन नागपूर शहराला मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व पालकमंत्री नितीन राऊत यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव, अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सतीश जाधव, मोटार वाहन निरीक्षक अभिजित खरे, रोहन सासने, सुर्यकांत पाटील आदींनी या मोहिमेसाठी वायुदल व रेल्वे विभागाशी समन्वय ठेवला. उद्यापर्यंत आणखी चार टँकर रेल्वेने येण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान,शनिवारी भिलाई व अंगूळ येथून एकूण १६९ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यापैकी जिल्ह्यातील ऑक्सिजन रिफिलिंग सेंटरला ६२ मेट्रिक टन व मेडिकल व अन्य रुग्णालयांना ७१ मेट्रिक टनाचे वितरण करण्यात आले आहे.

३ हजार ८६७ रेमडेसिवीर प्राप्त
नागपूर जिल्ह्यासाठी जिल्हा प्रशासनाला शनिवारी ३ हजार ८६७ रेमडेसिवीर प्राप्त झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून आवश्यकतेनुसार सर्व मागणी करणाऱ्या हॉस्पिटलला याचे वितरण केले जाणार आहे. तथापि, हॉस्पिटलकडून होणारी मागणी आणि होणारा पुरवठा अत्यंत कमी असून यासंदर्भात सातत्यपूर्ण पाठपुरावा जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे.

२९ हजार लसीची खेप प्राप्त
नागपूर जिल्ह्यामध्ये 45 वर्षावरील नागरिकांना पुरवण्या प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी उशिरा २९ हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. यामधील १४ हजार ५०० शहर व १४ हजार ५०० ग्रामीण भागात वितरण करण्यात आले असून या उपलब्ध लसीतून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात या लसीची देखील मागणी नोंदविली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement