Published On : Wed, Jun 26th, 2019

मागील एक वर्षांपासून नाल्यावरील भगदाड दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

कामठी :-दलित वस्त्यांचा विकास व्हावा या मुख्य उद्देशाने दरवर्षी नगर परिषद ला दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करोडोचा निधी प्राप्त होत असतो मात्र आजही कित्येक दलित वस्त्यांचा विकास हा विकास नसून भकास दिसून येतो ज्याची प्रचिती प्रभाग क्र 14 मध्ये दिसून येतो.या प्रभाग क्र 14 अंतर्गत येणाऱ्या बुद्ध नगर परिसरातील माजी नगरसेवक दादा कांबळे यांच्या घराजवळील एका मोठ्या नाल्याच्या स्लॅब ला मागील एक वर्षांपासून एक मोठे भगदाड पडले आहे या भगदाडात वस्तीतील 10 च्या जवळपास लहान बालके अपघाती जख्मि झाले

यासंदर्भात दुरुस्तीकरणासाठो नगर परिषद प्रशासनाचे लक्ष पुरवून तक्रार सुद्धा नोंदविली आहे इतकेच नव्हे तर सदर भगदाड च्या समस्येसह इतर असुविधा संदर्भात मागच्या वर्षी 7 जून ला नगरसेवक लालसिंग यादव यांनी न प विरोधात असहयोग जनआंदोलन पुकारले होते मात्र या आंदोलनाची तात्पुरीत्या घेतलेल्या दखल मधून एका नाल्याच्या कलव्हर्ट चो थातुरमातुर दुरुस्ती करण्यात आली मात्र सदर भगदाडा कडे अक्षम्य दुर्लक्ष पुरविन्यात आले ज्यामुळे नगर परिषद प्रशासन या भगदाडात कुण्या बालकाच्या मृत्यूची प्रतीक्षा करीत आहे का? वा या नाल्यात कुणाची बळी द्यायची आहे अश्या विविध चर्चेला उत असून हा प्रकार येथिल नागरिक बौद्ध वासीयांच्या मानवी हक्काशी सर्रास खेळ खेळला जात असून येथील नागरिकांच्या नैतिकतेचा अपमान करीत असल्याने कामठी नगर परोषद वर अट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी प्रभाग क्र 14 चे नगरवासी करीत आहेत.

Advertisement

प्रभाग क्र 14 हा दलित वस्ती मध्ये समावेश होत असून बहुतांश बौद्ध समाजाचे नागरिक वास्तव्यास आहेत. माजी नगराध्यक्ष मायाताई चवरे यांच्या कार्यकाळात यादव नगर ते बुद्ध नगर पर्यंत मोठा दगडी नाला बांधण्यात आला होता . तसेच या नाल्यावरुन लोकांना ये जा करन्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी एक मोठे कलव्हर्ट बांधण्यात आले असून मजबूत देखाव्याचे स्लॅब करण्यात आले होते.

Advertisement

यावरून दररोज शालेय विद्यार्थी शाळेत ये जा करणे , याच मार्गावर असलेले किराणा दुकानात खरेदी करणे तसेच शुक्रवारी बाजारात जाणे या कामासाठी आवागमान सुरू असते मात्र मागील एक वर्षांपूर्वी या मार्गावरील कलव्हर्ट स्लॅब वर मोठे भगदाड पडले ज्यामुळे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले असून अपघाती मृत्यूस निमंत्रक आहे तेव्हा पावसाळ्यात या भगदाडामुळे कुणाची जीवितहानी न व्हावी यासाठी नगर परिषद ने गांभीर्याने लक्ष पुरवावे अशी मागणी जोर धरत आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement