Published On : Wed, Jun 26th, 2019

27 उत्कृष्ट सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार

कामठी: -कामठी शहराच्या स्वच्छतेचे शिपाई म्हणून भूमिका साकारणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांत उत्कृष्ट कार्य करण्याची स्पर्धा निर्माण होत शहराच्याअ स्वच्छतेला वेग यावा या मुख्य उद्देशाने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी नियोजित केलेल्या संकल्पनेतून दर तीन महिन्याला वेगवेगळ्या कार्यातील प्रत्येकी 9 सफाई कर्मचाऱ्यांची छाननी करून त्यांना नगर परिषद तर्फे उत्कृष्ट सफाई कर्मचारी म्हणून पुरस्कारीत करण्याचे ठरवले यानुसार यावर्षी च्या 2019-20च्या सत्रातील एप्रिल-मे-जून या तीन महिन्यात उत्कृष्ट सफाई चे कार्य करणाऱ्या 27 कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली

व ही निवड दर तीन महिन्यांनी जाहीर करीत त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सम्माणीत करण्यात येणार आहे.यानुसार नाली सफाई, झाडू सफाई तसेच घनकचरा व्यवस्थापन चे प्रत्येकी 9 असे एकूण 27 कर्मचाऱ्यांना आज मुख्याधिकारी रमाकांत डाके व नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत तसेच स्वास्थ्य निरीक्षक विजय उर्फ गफ्फु मेथीयां यांच्या शुभ हस्ते कामठी नगर परिषद चे उत्कृष्ट कर्मचारी म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सम्माणीत करण्यात आले.

यानुसार नाली सफाई कामातील संजय बहादूर महोलिया(प्रभाग क्र 3), अमित रामलाल मधूमटके(प्रभाग क्र 8), संजू लालू गोयल(प्रभाग क्र 1), कमल किसन उज्जेनवार(प्रभाग क्र 2), आशिष बरसे (प्रभाग क्र 11), हरीचंद पसेरकर (प्रभाग क्र 15),राजू रुपसिंग झंझोटे (प्रभाग क्र 13),रोशन दशरथ समुंद्रे, (प्रभाग क्र 14),उमेश रुपलाल खरे(प्रभाग क्र 6) यांना प्रशस्तीपत्र देऊन सम्माणीत करण्यात आले ।


तसेच झाडू सफाई कामातील संजय श्यामलाल चव्हाण (प्रभाग क्र 4),मधू मुकेश बिल्लरवान (प्रभाग क्र 9),संध्या नल्लामवार (प्रभाग क्र 5), मनीषा विजय चव्हाण(प्रभाग क्र 10),राजेश रमेश मलिक (प्रभाग क्र 5),किरण राजेश उसरे(प्रभाग क्र 16),अजय लालू करिहार (प्रभाग क्र 13), निलम हाटे(प्रभाग क्र 12), गंगा अनिल इटकरे (प्रभाग क्र 10) तर घनकचरा व्यवस्थापन कार्यातील राजकुमार ग्रावकर(प्रभाग क्र 10), रामगोपाल गोयल(प्रभाग क्र 6), युवराज अशोक पारोचे (प्रभाग क्र 7), संदीप गिरधारी बक्सरे (प्रभाग क्र 9), हरीश सुरेश हाडोती (प्रभाग क्र 13), नितेश रमेश जेदिया(प्रभाग क्र 4), सचिन हत्तेल (प्रभाग क्र 3), सतीश धामती (प्रभाग क्र 1),चेतन झरोदे (प्रभाग क्र 8)यांना सुद्धा प्रशस्तीपत्र देऊन सम्माणीत करण्यात आले.

संदीप कांबळे कामठी