Published On : Tue, Oct 3rd, 2017

वाडीत न.प. हद्दीत जीवघेणा डेंगू आजाराने पुन्हा एका विद्यार्थ्याचा बळी

Advertisement

वाडी (अंबाझरी) :वाडी न प क्षेत्रातील विविध भागात डेंगू तापाने थैमान घातला असून आतापर्यत या आजाराने एका वृध्द इसमा सह दोन मुलांचा मृत्यू झाला असून मंगळवारी पुन्हा एका विद्यार्थाचा डेंगूने मृत्यू झाल्याची वार्ता समजताच वाडी न. प. ही चिंताग्रस्त दिसून आली व ही संख्या चार वर पोहचली, मृतक मुलाचे नाव यश संतोष दुपारे वय१२ वर्ष असून तो प्लॉट क्र .२७ लिचडे किराणा दुकान शेजारी सुरक्षा नगर येथील रहिवासी होता, तो वर्ग ५ वीत अॅन्जल किड्स या शाळेत शिकत होता. त्याचे वडील संतोष, आई व एक भाऊ १४ वर्षीय भाचा सोबत राहत होता .

त्यांचे वडील संतोष यांची ही दुःखद घटना घडल्यावर भेट घेतली असता आक्रोशीत होऊन म्हणाले की माझा मुलगा गेला आता कुणाला दोष देऊ ? रडतच त्यांनी सांगीतले की यश ला २९ तारखेला ताप आल्याने त्याला स्थानीक वाडी येथील डॉ.झारीया यांना दाखविले त्यांनी तपासून औषध दिले पुन्हा दोन दिवसांनी काही आराम न पडल्याने पुन्हा डॉक्टर झारीया यांच्याकडे दाखविले असता त्यांनी रक्त तपासनी व डेंगूची चाचणी करायास सांगीतले .

शंतनु लॅब मध्ये तपासणी अंती डेंगू असल्याचा अहवाल प्राप्त झाला .त्यामुळे आम्ही घाबरून गेलो डॉ झारीया यांनी पुन्हा औषधे देऊन त्याला घरी व्यवस्थीत जेवण व द्रव्य पदार्थ देण्याच्या सुचना दिल्या, मला त्यांनी भर्ती करण्याबाबद सुचना दिली नाही. घरी तो आजारा दरम्यान खाणे पिणे करण्यास नकार देत होता .जबर जस्ती ने काही खायला दिल्यास उलटी व सौचास करीत होता.

मंगळवारी अधिक प्रकृती ढासळत्याने त्याला तातडीने रविनगर येथे सेनगुप्ता मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल मध्ये दाखल केले, तेथील डॉक्टरनी तपासणी केली असता स्थिती गंभीर असल्याची पित्याला स्पष्ट कल्पना दिली. परंतू पित्याच्या विनंतीवरून त्यांनी उपचार सुरू केले, मात्र एका तासाच्या उपचाराअंती उपचाराला प्रतिसाद न देता यश ची प्राण ज्योत मावळली,