Published On : Tue, Jul 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

वाडीत गुंडगिरीचा कहर! युवकावर जीवघेणा हल्ला; शेकडो महिलांचा पोलीस ठाण्यावर हल्लाबोल

Advertisement

नागपूर : वाडी परिसरातील वाढत्या गुंडगिरी आणि गुन्हेगारी घटनांविरोधात नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. एका बाजूला जुन्या वादातून ३२ वर्षीय युवकावर तलवारीसह काठ्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला, तर दुसऱ्या बाजूला परिसरातील गुंडगिरी, अमली पदार्थांची विक्री आणि असामाजिक कृत्यांविरोधात शेकडो महिला, युवक आणि नागरिकांनी वाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत जोरदार आंदोलन केले.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडी येथील रहिवासी सुधीर उर्फ संजय राऊत यांना व्हॉट्सअॅप कॉल करून आठवा मैल बाजार येथे बोलावण्यात आले. तेथे आधीच दबा धरून बसलेल्या चार आरोपींनी तलवारीसारख्या धारदार शस्त्रांसह लाठ्या-काठ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ओठाला टाके पडले आहेत. तसेच नाकाचे हाडही तुटल्याचे सांगण्यात आले. आरोपींनी त्यांच्या दुचाकीचीही तोडफोड केली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जखमी युवकाने कसेबसे वाडी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले.

जखमी युवकाचा आरोप आहे की, परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध सट्टा व्यवसायाला विरोध केल्यामुळे जुन्या रागातून हा जीवघेणा हल्ला घडवून आणण्यात आला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

Advertisement

दरम्यान, आंबेडकर नगर परिसरातील वाढत्या गुंडगिरीमुळे संतप्त झालेल्या शेकडो महिला, युवक आणि स्थानिक नागरिकांनी वाडी पोलीस ठाण्यावर धडक दिली. आंदोलनकर्त्यांनी निवेदन देत काही समाजकंटक खुलेआम शस्त्रे घेऊन फिरत असल्याचा, तोडफोड, दमदाटी आणि दहशत निर्माण करत असल्याचा आरोप केला. तसेच परिसरात अमली पदार्थांची विक्री आणि महिलांची छेडछाड होत असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत परिसरातील पोलीस गस्त वाढविण्यात येईल तसेच प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. सध्या पोलीस दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.