Published On : Wed, Nov 20th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्रात मतदानाला सुरुवात;पंतप्रधानांनी मराठीतून जनतेला केले मतदान करण्याचे आवाहन

Advertisement

मुंबई :विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पाडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून राज्यातील प्रत्येक केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील मतदारांसाठी मराठीतून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

एक्सवर पोस्ट करत मोदी म्हणाले,आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागांसाठी मतदान होत आहे. राज्यातील सर्व मतदारांना माझे आग्रहाचे आवाहन आहे की त्यांनी उत्साहाने या प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि लोकशाहीच्या या उत्सवाची शोभा वाढवावी. यावेळी सर्व तरुण आणि महिला मतदारांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन मतदान करावे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये पुरूष मतदार ५ कोटी २२ हजार ७३९ तर महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ आहेत.दिव्यांग मतदार ६ लाख ४१ हजार ४२५, तृतीयपंथी मतदार ६ हजार १०१ आणि सेना दलातील मतदार १ लाख १६ हजार १७० असे एकूण ९ कोटी ७७ लाख ८२ मतदार राजाच्या हाती महाराष्ट्रातील सत्तेच्या चाव्या असणार आहेत. महाराष्ट्रामध्ये भाजप सर्वाधिक १४९ जागांवर निवडणूक लढवत आहेत. शिवसेना ८१ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस ५९ जागा, शरद पवार गट १०१ जागा, काँग्रेस ८६ जागा, शिवसेना (उबाठा) : ९५ जागा, मनसे १२५ जागा, वंचित बहुजन आघाडी २०० जागा, बसप २३७ जागा आणि अपक्ष २,०८६ जागांवर लढत आहेत.

Gold Rate
15 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,900 /-
Gold 22 KT ₹ 1,23,600 /-
Silver/Kg ₹ 1,92,100/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement