Published On : Wed, Nov 6th, 2019

पदवीधर मतदार नोंदणीचा ६ नोव्हेंबर शेवटचा दिवस

Advertisement

पदवीधर मतदारांनी आजच आपली पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करून घ्या, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी गडचिरोली

गडचिरोली: दिनांक ६ नोव्हेंबर ही पदवीधर मतदार नोंदणी करण्याची अंतिम तारीख असून गडचिरोली जिल्ह्यातील पात्र पदवीधर मतदारांनी आजच फॉर्म 18 भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
मतदारनोंदणी कार्यक्रमानुसार दिनांक 6 नोव्हेंबर पर्यंत नमुना 18 किंवा 19 द्वारे दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी यापूर्वीच जाहीर करण्यात आला होता.

Advertisement
Advertisement

त्यानुसार पदवीधर मतदारांनी आपली नोंदणी नव्याने तयार करण्यात येत असलेल्या पदवीधर मतदार संघाच्या पुनरिक्षण कार्यक्रमात समाविष्ट करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. यासाठी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर फॉर्म 18 किंवा तालुक्याच्या तहसिल कार्यालयात किंवा जिल्ह्याच्या निवडणूक शाखेत फॉर्म 18 उपलब्ध आहे, तो प्राप्त करून पदवीधरांनी तो भरून आपल्या मतदार नोंदणीसाठी सादर करावा. सदर मतदार यादीत नोंदणी करण्याकरिता १ नोव्हेंबर 2019 पूर्वी किमान तीन वर्ष भारताच्या राज्य क्षेत्रातील विद्यापीठाची एकतर पदवी किंवा त्याच्याशी समतुल्य अर्हता धारण केलेली असेल, अशी प्रत्येक व्यक्ती पात्र असेल. त्यांनी नमुना 18 सोबत पदवी प्रमाणपत्र किंवा पदवी गुणपत्रक, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.

सदर याद्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदार संघाच्या असून प्रत्येक पदवीधर निवडणुकीआधी त्या नव्याने तयार कराव्या लागतात. यापूर्वी मतदान नोंदणी केलेल्या सर्व पदवीधर मतदारांनी पुन्हा यासाठी नोंदणी करणे आवश्‍यक असते.

नोंदणीसाठी आवश्यक अहर्ता
जी व्यक्ती भारताची नागरिक आहे, त्या मतदार संघातील सर्वसाधारण रहिवासी आहे आणि ती 1 नोव्हेंबर 2019 पूर्वी किमान तीन वर्ष भारताच्या राज्य क्षेत्रातील विद्यापीठाची एकतर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली अहर्ता धारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती आपले नाव पदवीधर मतदार यादीत समाविष्ट करण्यास पात्र असेल.

अर्ज कोठे मिळेल व तो कोठे सादर करावा ?
नमुना 18 मधील छापील अर्ज मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी यांच्या कार्यालयाकडून उपलब्ध होईल. म्हणजेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरावर निवडणूक शाखेत व प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात छापील अर्ज फॉर्म 18 उपलब्ध आहेत. तसेच या व्यतिरिक्त हस्तलिखित, टंकलिखित, चक्रमुद्रित किंवा खाजगीरित्या छापलेले अर्जदेखील स्वीकारले जाणार आहेत. पदवीधारक मतदारांनी आपले नाव नोंदणी करण्यासाठी सदर अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित तहसील कार्यालय किंवा जिल्हा स्तरावर निवडणूक शाखेत दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ .०० वाजेपर्यंत जमा करावा.

– नागपुर पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी सुरू झालेली असून आपले नाव मतदार यादीत असो वा नसो, सर्वांना मतदार नोंदणी करायची आहे त्यासाठी खालील महत्वाच्या बाबी लक्षात घ्याव्यात.

– नवीन नोंदणी 1 ऑक्टोबर 2019 पासुन सुरु झालेली आहे. बहुसंख्य पदवीधरांनी नोंदणी केलेली आहे परंतु अजुनही नोंदणी न केलेल्यांसाठी अंतीम मुदत 6 नोव्हेंबर 2019 आहे.अंतिम मुदतीपुर्वी आपली व सहकार्‍यांचीही पदवीधर नोंदणी करुन घ्यावी.

– या अगोदर पदवीधर मतदार असलेल्यांनी ही नव्याने पुन्हा नोंदणी करावयाचीच आहे.

नाव नोंदणी अटी
– 1 नोव्हेंबर 2016 पूर्वी कोणत्याही विद्यापीठातुन पदवीधारक अथवा पदवी समकक्ष अर्हता प्राप्त पाहिजे* म्हणजे निकाल 1 नोव्हेंबर 2016 पूर्वी लागलेला हवा.

– पदवीधारक कोणाला म्हणायचे-* बी.ए, बी. कॉम, बी.एस्सी, बी ई (सिव्हिल,मेकॅनिकल,आय टी,कॉम्प्युटर), बी.ए.एम.एस, बी.डी.एस, बी.सी.एस, बी.बी.ए, बी.सी.ए, 12 नंतर 3 वर्षाचा कोणताही डिप्लोमा, बी.फार्म, बी.लीब इ.पदवीधारक मतदान करू शकतात.

– नागपुर विभागा अंतर्गत येणाऱ्या वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, या जिल्ह्यातील रहिवासी असावा*

नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया
– या पोस्ट सोबत पदवीधर नाव नोंदणी फॉर्म-18 पाठवत आहोत* त्याची प्रिंट काढावी. किंवा आपल्या तहसिल कार्यालय अथवा त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडून फॉर्म नंबर 18 घेऊन त्यामध्ये पासपोर्ट फोटो चिटकवून, स्वतःचे पूर्ण नाव, वडिलांचे पूर्ण नाव, स्वतःचे शिक्षण, जन्म तारीख, व्यवसाय, पत्ता, विधानसभा मतदार संघ, मतदान असलेल्या गावाचा भाग क्रमांक (मतदार केंद्र क्रमांक), मतदार ओळखपत्र (ईपीक) क्रमांक, फोन नंबर, पदवी विद्यापीठ नाव, पदवी प्राप्त वर्ष आदी माहिती भरून मागणीदाराची स्वाक्षरी करावी.

– पूर्ण भरलेला फॉर्म आपल्या गावाच्या मंडळ अधिकारी किंवा तहसिल कार्यालय येथे स्वतः जमा करावा* (काही तहसिल अंतर्गत बूथ लेव्हल अधिकारी ही नेमलेले आहेत, यासंदर्भात माहिती तहसिल कार्यालयात मिळेल.)

फॉर्म सोबत
स्वतःचा एक पासपोर्ट फोटो
शिक्षणाचा पुरावा- आपल्या पदवीचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र
– रहिवासी पुरावा
मतदार ओळखपत्र/आधार कार्ड/रहिवासी दाखला/लाईटबील
जन्मतारखेचा पुरावा- आधार कार्ड/शाळा सोडल्याचा दाखला/ड्रायव्हिंग लायसन्स/जन्म दाखला
या *साक्षांकित (attested) प्रतीच जोडव्यात*

– विवाहित महिलांचे लग्नापूर्वी वडिलांच्या नावाने शिक्षण झालेले असते आणि लग्नानंतर कागदोपत्री पतीच्या नावाने नोंदी असतात. अशांसाठी महिलांनी मॅरेज सर्टिफिकेट(विवाह नोंदणी दाखला) किंवा पॅनकार्ड साक्षांकित प्रत जोडावी*

– पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही.
– त्यामुळे अर्ज हा आपल्या तहसिल कार्यालयात किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकारी यांच्याकडे_ जाऊनच भरावा लागणार आहे.

विशेष आवाहन
१ नोव्हेंबर २००५ पुर्वी वा नंतर लागलेले सर्व पेन्शनधारक व पेन्शनविहीन कर्मचारी, आपण जुनी पेंशन चा संघर्ष हा सर्व *लोकशाही आयुधांचा* वापर करून करत असताना पदवीधर मतदारसंघात आपल्या नावाचा *मतदार* म्हणून समावेश असणे हे अत्यंत महत्वाचे आहे.

– त्यामुळे तुमच्यासह तुमच्या परिवारात, शाळेत वा कार्यालयात जे जे पदवीधर आहेत त्या सर्वांची मतदार नोंदणी करण्याची ही संधी दवडू नका.
– तेव्हा आजच वेळ काढून जवळच्या तहसील कार्यालयात जावून आपल्या नावाची नोंदणी करावी.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement