Published On : Fri, Aug 11th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूरकरांना रेशन दुकानात करता येणार मतदार नोंदणी !

Advertisement

नागपूर : मतदान ही एखाद्या गटास अथवा समूहास, विशिष्ट निवडणुकीसाठी अथवा एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी लिखित अथवा ठरविलेल्या माध्यमाद्वारे (जसे: मतदान यंत्र इत्यादी.) मतप्रदर्शन करण्याची एक पद्धती आहे. त्यामुळे १८ व्या वर्षानंतर मतदान करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. यासंदर्भात आता महत्त्वाचे वृत्त समोर आले आहे.

नागपूरकरांना आता मतदान नोंदणीसाठी आता निवडणूक कार्यालयात जाण्याची गरज नाही, ऑनलाईन नोंदणी करता येत नसेल तरी काही अडचण नाही, घराजवळच्या सरकारी रेशन दुकानात गेले तरी मतदार नोंदणी करता येईल, इतकी सोपी व्यवस्था करण्यात आली आहे. रेशन दुकानात नवीन मतदार नोंदणी, नाव वगळणे व दुरुस्तीबाबत सर्व अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Gold Rate
07 May 2025
Gold 24 KT 97,500/-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 96,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उपक्रमाची सुरुवात अगोदर पश्चिम नागपूरमध्ये होणार आहे. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी माधुरी तिखे यांच्या अध्यक्षतेखाली स्वस्त धान्य दुकान चालकांची बैठक झाली. त्यांना मतदार नोंदणीबाबत माहिती देण्यात आली. याबाबतची माहिती प्रत्येक दुकानाच्या फलकावर लावण्यात आली आहे. नोंदणी करताना काही अडचण आल्यास टोल फ्री क्रमांक १९५० वर संपर्क करा असे आवाहनही करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement