Published On : Wed, Apr 29th, 2020

राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक करताहेत कोरोनासंदर्भात जनजागृतीचे कार्य

रामटेक: विद्यासागर कला महाविद्यालय रामटेकच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांतर्फे कोरोना या वैश्विक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या संकटासंदर्भात गावपातळीवर जनजागृती करण्याचे राष्ट्रीय कार्य करण्यात येत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनची अवस्था सुरू आहे. यात प्रत्येक नागरिकाला घरी राहून सहकार्य करण्याचे आवाहन सरकारने केलेले आहे.

या बिकट परिस्थितीत गोरगरीब जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा होत असल्याने असल्या गरजू लोकांसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांतर्फे फेसमास्क तयार करून त्यांचे ग्रामीण भागातील गरजू लोकांना त्याचे वाटप करण्यात येत आहे.

त्याचबरोबर सॅनिटायझर तयार करणे, जनजागृती करण्यासाठी फलक तयार करणे, डिजिटल व्हिडिओ ,प्रतिमा, संदेश तयार करून ग्रामस्थांना कोरोनाच्या बचावासाठी समंत्रण करणे या सर्व प्रकारच्या गोष्टीचा समावेश आहे. युवा कार्य मंत्रालयाचे IGOT Portal ची तसेच आरोग्य सेतू अँप स्वतः मोबाईल मध्ये डाउनलोड करून ग्रामवासियाच्या मोबाइलमधे डाउनलोड करण्यासाठी मदत करणे, गरजू लोकांना अन्न धान्याचे वाटप करणे स्थानिक प्रशासकीय यंत्रनेसोबत सहकार्य करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सर्वं स्वयंसेवक करीत आहेत. हे सर्व करीत असताना सामाजिकदुरीचे पालन करून राष्ट्रीयकार्यात महत्त्वाचे योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कु. स्नेहल खेडीकर, सुश्रुत हिंगे, निखिल गुरफोडे, मोनिका हिवसे, पुष्पा चवरे , प्रलय भोवते या विद्यार्थ्यांची अत्यंत मोलाचेN कार्य केलेले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पिल्लई, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. गिरीश सपाटे, प्रा. अनिल दाणी यांनी सर्व स्वयंसेवकांचे अभिनंदन केले.