Published On : Wed, Sep 22nd, 2021

मनपाच्या रक्तदान शिबिरास स्वयंस्फूर्तीने पुढाकार

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या झोन क्रमांक २, सात माजली इमारतीतील पहिल्या माळ्यावर बुधवारी (ता. २२) रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात मनपा कर्मचारी व नागरिकांनी देखील उत्तम प्रतिसाद देत रक्तदानास स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला.

पावसाळ्याच्या दिवसात डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव वाढून रक्ताची कमतरता जाणवत असते. रुग्णांची रक्ताची गैरसोय दूर करण्यासाठी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने मनपा कार्यक्षेत्रात सप्टेंबर महिन्यात दर आठवड्याला एक असे एकूण चार रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहेत. आतापर्यंत तीन शिबीर पार पडले.

आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल यांच्यासह मुख्य प्रशासकीय कार्यालयातील सर्व कर्मचारी, झोन क्रमांक एक संजय गांधी मार्केट येथील कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. बुधवार, ता. २२ रोजी झोन क्रमांक २ मध्ये सात मजली इमारत येथे घेण्यात आलेल्या शिबिरात झोन कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.