Published On : Thu, Oct 31st, 2019

लिहिगावात रक्तदात्यांनी केले स्वेच्छेने रक्तदान

कामठी :- समता सैनिक दल शाखा लिहिगाव च्या वर्धापन दिनानिमित्त नवयुवक शारदा उत्सव मंडळ च्या वतीने काल 30 ऑक्टोबर ला लिहिगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चॉक लिहिगाव येथे आयोजित रक्त दान व शारीरिक तपासणी शिबीर यशस्वीरीत्या पार पडला .शिबिरात मोठ्या संख्येत तरुणांनी स्वेच्छेने रक्तदान केले.या शिबिरात अमन रक्तपेढी नागपूर च्या डॉ गुरबानी, प्रिया,श्रेयस सहारे व वैद्यकीय चमूने विशेष वैद्यकीय सेवा पुरवून रक्तसंकलन केले.

याप्रसंगी ,केशवराव धुळस, प्रमोद खांडेकर ,संघपाल डोंगरे ,जितू निकाळजे,हरीश धुळस,तुकाराम धुळस,अनिकेत धुळस,घनश्याम निकाळजे,प्रवीण निकाळजे,जीवन दादा,निलू कुठें, दिनेश निकाळजे,शुभम वासनिक,रितीक धुळस,अभिषेक धुळस,कुणाल धुळस,रोशन धुळस,अनुज धुळस,वैभव धुळस,नामदेव निकाळजे,किशोर हूड,मोरेश्वर राऊत,शुभम हिवसे,गौरव धुळस,सुधाकर निकाळजे,कोमल रंगारी,बबलू निकाळजे,शरद धुळस,प्रकाश धुळस,गोलू निकाळजे, व मित्र मंडळ परिवार लिहिगाव ने मोलाची भूमिका साकारली.

संदीप कांबळे कामठी