Published On : Wed, Apr 7th, 2021

नासुप्र व नामप्रविप्रा कार्यालयात अभ्यागतांना प्रवेश बंद

Advertisement

नागरिकांनी आपले अर्ज ई-मेल अथवा लिखित अर्ज नासुप्र व नामप्रविप्रा येथे ड्रॉप बॉक्समध्ये जमा करावेत


नागपूर: नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (नामप्रविप्रा) या दोन्ही कार्यालयात नागरिकांना प्रवेश प्रतिबंध करण्यात आला आहे, त्यांमुळे आता नागरिकांना पुढील आदेशापर्यंत नासुप्र व नामप्रविप्रा कार्यालयात प्रवेश करता येणार नाही. मात्र, नागरिकांना कार्यलयाशी संबंधित काही कामे असल्यास त्यांनी आपले अर्ज ऑनलाईन स्वरूपात नासुप्रच्या nagpurnit@hotmail.com व नामप्रविप्राच्या nmrda@hotmail.com या अधिकृत ई-मेलवर पाठवता येणार आहे. तसेच http://nitnagpur.org व http://nmrda.org या वेबसाईटवरून देखील नागरीक संपर्क करू शकतात.

इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसल्यास किंवा ज्या नागरिकांना ई-मेल करता येत नसल्यास अश्या सर्व नागरिकांसाठी नासुप्रच्या मुख कार्यालयातील प्रवेशद्वारवर ड्रॉप बॉक्स सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिकांनी याठिकाणी आपले लिखित अर्ज जमा करावे, असे आवाहन ‘नामप्रविप्रा’चे महानगर आयुक्त तथा ‘नासुप्र’चे सभापती मा. श्री मनोजकुमार सूर्यवंशी यांच्यातर्फे करण्यात आले आहे. अर्जाची पोच पावती नागरिकांना त्यांच्या दिलेल्या मोबाईल क्रमांकावर, व्हाट्सएप अथवा ई-मेल वर देण्यात येईल.

राज्य शासनाच्या महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनातर्फे ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले असून नागरिकांनी नासुप्र व नामप्रविप्रा कार्यालयात येणे टाळावे, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही.