| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jan 1st, 2019

  राज्यस्तरीय समिती पथकाची कामठी पंचायत समिती ला भेट

  कामठी :-पंडित दिंनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2019 या केंद्रशासनाच्या पुरस्कृत केलेल्या स्पर्धेत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील अहमद नगर जिल्ह्यातील रहाता पंचायत समिती तसेच नागपूर जिल्ह्यातील कामठी पंचायत समिती चो प्रामुख्याने निवड करण्यात आली तसेच इतर चार ते पाच ग्रामपंचायतीची सुद्धा निवड करण्यात आली असून त्याबाबतची तपासणी करण्यासाठी आज 29 डिसेंबर ला पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2019 राज्यस्तरीय समिती पथकाने कामठी पंचायत समितीला भेट दिली यावेळी पंचायत समितीच्या आवश्यक त्या दस्ताऐवजाची पडताळणी करून पंचायत समितीने राबविलेले उपक्रम ची तपासणी करीत संपूर्ण कार्यालयातील देखरेखीसह सौरऊर्जेवर चालनाऱ्या संयंत्राची सुद्धा पाहणी केली.

  यावेळी पंचायत समितीच्या कामाची प्रशंसा करून समाधान व्यक्त केले.तसेच कामठी तालुक्यातील कढोली ग्रामपंचायत ला भेट देत ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आलेल्या उपक्रमाची तपासणी सह, संबंधित दस्ताऐवजाची तपासणी करून गावातील विकासकामांचा सुद्धा आढावा घेतला तसेच गावातीलवृक्षलागवड,नाला खोलीकरण, आदर्श डिजिटल अंगणवाडी, सुसज्ज जी प प्रा शाळा , वनराई बांधारा, स्मशानभूमी या कामाची प्रत्यक्ष भेट देत कढोली गाव हे आदर्श गाव असल्याचा प्रशंसा करीत समाधान व्यक्त केले.

  केंद्र व राज्यशासन पुरस्कृत समस्त योजना प्रभावीपणे राबविण्यात अववल असलेली कामठी पंचायत समितीला सन 2015 मध्ये यशवंत पंचायत राज अभियान स्पर्धेत विभागस्तरीय तृतीय पुरस्काराने सम्माणीत करण्यात आले आहे तसेच सन 2017 मध्ये विभाग स्तरीय दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले आहे याचं पुरस्काराची उंच भरारी झेप घेत पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2019 या केंद्रशासनाच्या पुरस्कृत स्पर्धेत सहभाग नोंदविला असून या प्रथम क्रमांक प्राप्त करण्याचे दृष्टीने अथक परिश्रम करून राज्यात अववल करण्याचा निर्धार केला असून याबाबत पंचायत समिती अधिकारी कर्मचारी आशावादी आहेत.

  या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कामठी पंचायत समितीने ऑनलाईन नामांकन दाखल केले होते यामध्ये सन 2017-18मध्ये पंचायत समिती कार्यालयाने केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने राबवून कोणकोणते उपक्रम राबविले यावर विविधांगी प्रश्न विचारण्यात आले होते ज्यामध्ये प्रश्नांची समर्थक ठरणारे आवश्यक पुराव्यासह दिलेल्या उत्तरातून प्रत्येक प्रश्ननोहाय देण्यात आलेल्या गुणांनुसार नागपूर विभागातून कामठी पंचायत समितीला 98 गुण प्राप्त झाले होते याबाबत नेमलेल्या संबंधित समितीच्या अधिकाऱ्याकडून जिल्हास्तरिय , विभागस्तरिय तपासणी करण्यात आली यावरील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या कामठी पंचायत समिती च्या तपासणी साठी आज राज्यस्तरिय तपासणी पथकाने कामठी पंचायत समितीला भेट देत तपासनी केली तसेच कढोली ग्रामपंचायत मध्ये शुद्ध भेट देऊन तपासनि केली.

  या राज्यस्तरीय समिती तपासणी पथकात बुलढाणा जिल्हा परिषद चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नेमाने, ग्रामविकास अधिकारी फुटाणे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी चोपडे,जाधव, नागपूर जिल्हा परिषद अतिरिक्त कार्यपालन अधिकारी केदार यांचा समावेश होता.याप्रसंगी कामठी पंचायत समिती चे बीडीओ सचिन सूर्यवंशी , सहाययक गट विकास अधिकारि सुरेश कोल्हे, विस्तार अधोकारी शशिकांत डाखोळे, पशुधन विकास अधिकारी डॉ मानकर, शिक्षन विस्तार अधिकारी कश्यप सावरकर, प्रशासन अधिकारी अरविंद अंतुरकर, विस्तार अधिकारी जयंत दंडारे, लेखाधिकारी विनोद टेंभुरने, शुभांगी कांमडी, ललिता मोहाडीकर, मनोज आदी उपस्थित होते तर कढोली ग्रा प च्या भेटीत सरपंच प्रांजल वाघ, उपसरपंच , सदस्य तसेच सचिव प्रामुख्याने उपस्थित होते

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145