Published On : Wed, Jan 9th, 2019

केंद्रीय कृषीराज्य मंत्री कृष्णाराज यांची दीक्षाभूमीला भेट

नागपूर: भारत सरकारच्या केंद्रीय कृषी राज्य मंत्री श्रीमती कृष्णाराज यांनी रविवारी दीक्षाभूमी येथे भेट दिली. येथील प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेऊन आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी भाजपा अनु.जाती मोर्चाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

दीक्षाभूमीलगत असलेल्या कृषी खात्याची चार एकर जमीन दीक्षाभूमी समितीला हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी भाजपा अनू.जाती मोर्चाच्यावतीने करण्यात आली.

यावेळी उपनेत्या वर्षा ठाकरे, विधी समिती सभापती अड धर्मपाल मेश्राम, महिला आघाडी अध्यक्ष डॉ.किर्तीदा अजमेरा, माधव नेत्रालयाचे संचालक विमल श्रीवास्तव, मोर्चाचे महामंत्री सतीश शिरसावन व अड राहूल झांबरे, बंडू गायकवाड, संदीप बेले, अमित गांजरे, अजय करोसिया, श्वेता निगम, तत्वराज देशपांडे, नितीन टाकभोरे, नितीन माकोडे यांच्यासह बरेच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.